Poonam Pandey: ज्या कॅन्सरबाबत सांगून तिनं लोकांना मूर्ख बनवलं, तो अत्यंत खतरनाक! ज्यांना खरंच होतो त्यांना...

Last Updated:

एका जीवघेण्या आजाराने वयाच्या 32व्या वर्षी अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. परंतु आज ती जिवंत असल्याचं कळताच त्याहून मोठ्या धक्क्याने तिचे फॅन्स हादरले. अनेकजणांनी याविरोधात सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.

जवळपास दर 8 मिनिटांनी या कॅन्सरशी झुंजणाऱ्या एका महिलेचा मृत्यू होतोय.
जवळपास दर 8 मिनिटांनी या कॅन्सरशी झुंजणाऱ्या एका महिलेचा मृत्यू होतोय.
अंजली सिंह राजपूत, प्रतिनिधी
लखनऊ : मॉडेल, अभिनेत्री आणि रियालिटी शो स्टार पूनम पांडे ही जिवंत आहे. तिने शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून फॅन्सची माफी मागितली. आदल्याच दिवशी तिच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरली होती. तिच्या मॅनेजरनेच इंस्टाग्राम पोस्ट करून पूनमचा सर्वायकल कॅन्सरने मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. एका जीवघेण्या आजाराने वयाच्या 32व्या वर्षी अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. परंतु आज ती जिवंत असल्याचं कळताच त्याहून मोठ्या धक्क्याने तिचे फॅन्स हादरले. अनेकजणांनी याविरोधात सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. 'हा काय मूर्खपणा', असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, ज्या कॅन्सरने पूनमचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती त्याबाबत अनेकजणांना पुरेशी माहिती नसते.
advertisement
पूनमच्या निमित्ताने कदाचित आपणही हे नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल. हा कॅन्सर HPV आणि शारीरिक संबंधांतून होणाऱ्या इंफेक्शनमधून होतो. एचपीवी हा ह्यूमन पैपिलोमा व्हायरसचा एक असा गट आहे ज्यातले 14हून अधिक व्हायरस वेगवेगळ्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतात.
सर्वायकल कॅन्सरची लक्षणं स्पष्टपणे जाणवत नाहीत, त्यामुळे त्याचं लवकर निदान होत नाही. परिणामी त्यावर उपचार उशिरा होतात. आयसीएमआर (Indian Council of Medical Research)च्या आकडेवारीनुसार भारतात सर्वायकल कॅन्सरची रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. जवळपास दर 8 मिनिटांनी या कॅन्सरशी झुंजणाऱ्या एका महिलेचा मृत्यू होतोय.
advertisement
उत्तर प्रदेशची आकडेवारी तर अतिशय धक्कादायक आहे. इथं दरवर्षी 10 पैकी 4 महिलांचा सर्वायकल कॅन्सरमुळे मृत्यू होतो. यामागचं सर्वात मोठं कारण आहे हे आहे की, लोकांना सर्वायकल कॅन्सरची माहितीच नसते. अनेक महिला तर शेवटच्या स्टेजला डॉक्टरांकडे धाव घेतात. जेव्हा त्यांना वाचवणं अवघड नाही तर जवळपास अशक्य असतं. अपोलो हॉस्पिटल, लखनऊचे मेडिकल ऑन्कोलॉजी डॉक्टर अनिमेष अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
advertisement
सुरूवातीच्या स्टेजमध्ये अजिबात दिसत नाहीत लक्षणं!
डॉ. अनिमेष अग्रवाल यांनी सांगितलं की, सर्वायकल कॅन्सर हा मोठ्या प्रमाणात 35 ते 40 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये दिसून येतो. महिलांच्या गर्भाशयाचा जो सर्वात खालचा भाग असतो तो गर्भाशयाला योनीशी जोडतो. या भागाला म्हणतात Cervix. जेव्हा या Cervixमध्ये पेशींची असामान्यपणे, वेगाने वाढ होते तेव्हा सर्वायकल कॅन्सरची सुरूवात होऊ लागते. लक्षणं न दिसल्यानंच हा कॅन्सर खतरनाक, जीवघेणा असतो. ह्यूमन पैपिलोमा व्हायरस (एचपीवी) हे या कॅन्सरमागचं मुख्य कारण आहे. शिवाय एकापेक्षा अनेक व्यक्तींसोबत शारीरिक संबंध ठेवणं, शारीरिक संंबंधांतून इन्फेक्शन होणं (STDs), दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्या घेणं, धुम्रपान करणं, HIV संसर्ग, इत्यादींमुळेसुद्धा हा आजार होऊ शकतो.
advertisement
सर्वायकल कॅन्सरची लक्षणं
  • मासिकपाळीदरम्यान असह्य त्रास.
  • शारीरिक संबंधांनंतर रक्तस्त्राव.
  • वयोमानानुसार मासिकपाळी बंद झाल्यानंतरही रक्तस्त्राव.
  • योनीतून होणाऱ्या रक्तस्रावातून दुर्गंध येणं.
  • गर्भाशयाच्या ठिकाणी सतत दुखणं.
सर्वायकल कॅन्सरपासून वाचावं तरी कसं?
डॉ. अनिमेष अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सर्वायकल कॅन्सरवर लसीकरण होतंय. सरकारने 9 वर्षांपासून 14 वर्षांच्या मुलींसाठी कॅन्सरचं लसीकरण मोफत केलं आहे. आता हळूहळू याबाबत जागरूकता निर्माण होईल. सर्व मुलींनी ही लस घ्यायला हवी. शिवाय तिशीनंतर वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करायला हवी.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/मनोरंजन/
Poonam Pandey: ज्या कॅन्सरबाबत सांगून तिनं लोकांना मूर्ख बनवलं, तो अत्यंत खतरनाक! ज्यांना खरंच होतो त्यांना...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement