कडधान्य, पालेभाज्या बनवताना कांदा आणि आल्याचा वापर टाळताय? मग आधी हे वाचाच
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आपल्या शरीराला आवश्यक घटक योग्य प्रमाणात मिळत नाहीत. या गोष्टींपैकी असणारी एक गोष्ट म्हणजे कडधान्य किंवा पालेभाज्या बनवताना त्यामध्ये कांदा आणि आल्याचा वापर न करणे.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : आपला आहार संतुलित असावा असं प्रत्येकाला वाटतं त्यासाठी प्रत्येक जण काळजी देखील घेत असतो. परंतु न कळत बऱ्याचदा काही गोष्टींमुळे आपल्या शरीराला आवश्यक घटक योग्य प्रमाणात मिळत नाहीत. या गोष्टींपैकी असणारी एक गोष्ट म्हणजे कडधान्य किंवा पालेभाज्या बनवताना त्यामध्ये कांदा आणि आल्याचा वापर न करणे. असे केल्याने त्यातील पोषक तत्वे शरीराला नीट मिळत नाहीत याबद्दच कोल्हापुरातील आहारतज्ज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी माहिती सांगितली आहे.
advertisement
बऱ्याचदा आपल्या आहारातील पदार्थ बनवताना त्यातील घटक पाककृतीत सांगितल्याप्रमाणे ठेवत असतो. मात्र कडधान्य किंवा पालेभाज्या बनवताना बऱ्याच गृहिणी कांदा किंवा आलं यांचा वापर टाळतात. काहीजण तर कांद्याचा वापर आवर्जून टाळत असतात. मात्र असे करणे चुकीचे आहे, असे मत अमृता सूर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे.
advertisement
कांदा, आलं का आहे आवश्यकच?
कडधान्यांमध्ये इतर प्रथिना व्यतिरिक्त ब जीवनसत्वे, खनिज घटक आणि मेद भरपूर प्रमाणात असतात. तसेच कडधान्यात थायमीन, रिबोफलेवीन, नायसीन, चुना, लोह, स्फुरद देखील काही प्रमाणात असते. तर पालेभाज्या विविध जीवनसत्त्वांचे उत्कृष्ट स्रोत असतात. तसेच पालेभाज्या कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह या खनिजांनी युक्त असतात. दरम्यान कडधान्य किंवा पालेभाज्यांमध्ये झिंक हे खनिज देखील असते. हे झिंक शरिराकडून शोषून घेण्यासाठी सल्फरची गरज असते. हे सल्फर कांदा किंवा आल्यातून मिळत असते. त्यामुळेच पालेभाज्या, कडधान्य किंवा झिंक असलेल्या भाज्या बनवताना त्यातील झिंक शरीराने योग्यरित्या शोषून घेण्यासाठी कांदा, आलं यांचा वापर केलाच जावा, असे अमृता सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
advertisement
झिंकचे शरीराला काय आहेत फायदे ?
बऱ्याच अन्नघटकांमध्ये नैसर्गिकरित्या खनिज घटक उपलब्ध असतात. त्यापैकीच एक खनिज म्हणजे झिंक होय. झिंकमुळे शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. शरीरावरील जखमा झिंकमुळे लवकर बऱ्या होतात. त्यामुळे झिंकयुक्त भाज्यांचे नियमित सेवन केले जावे, असेही अमृता यांनी स्पष्ट केले आहे.
Location :
Kolhapur,Kolhapur,Maharashtra
First Published :
February 01, 2024 11:08 AM IST