TRENDING:

तुम्हाला सतत ॲसिडीटी होते? करा ‘हे’ सोपे प्रकार, ॲसिडीटीला सारा दूर

Last Updated:

Acidity चे अनेक प्रकार आहेत. काहीच्या छातीत जळजळ होते तर पोटात तर काहीच्या घशात. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही ॲसिडीटीला दूर ठेऊ शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
How to Prevent Acidity बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आजारावर विपरीत परिणाम झालेला दिसतो. अशा आजारांना डॉक्टर लाईफस्टाईल डिसीज या नावाने संबोधतात, ज्यात डायबिटीस, हार्ट ॲटॅक पासून ते ॲसिडिटीपर्यंतच्या आजारांचा समावेश होतो. ॲसिडीटीचे अनेक प्रकार आहेत. काहीच्या छातीत जळजळ होते तर पोटात तर काहीच्या घशात. ॲसिडीटीवर आत्ता औषधं जरी उपलब्ध असली तरीही काही सोप्या टिप्स आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही ॲसिडीटीला दूर ठेऊ शकता.
Acidity चा त्रास कमी करायचा आहे? मग करा ‘हे’ उपाय
Acidity चा त्रास कमी करायचा आहे? मग करा ‘हे’ उपाय
advertisement

झोपण्याची पद्धत बदला

छातीतली जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही कसं झोपता हे जास्त महत्त्वाचं आहे. अतिरिक्‍त उशी घेऊन डाव्‍या कुशीवर झोपल्‍याने ॲसिडीटी कमी होण्यास मदत होते. कारण सरळ सरळ पाठीवर झोपल्‍याने ॲसिड रिफ्लक्‍सचा त्रास होऊ शकतो.

'benefits of clove स्वयंपाकघरातला ‘हा’ मसाला अनेक आजारांना ठेवेल दूर'

झोपेचं नियोजन करा

advertisement

दररोज तुमची झोप अपुरी असेल तर तुमचा ॲसिडीटीचा त्रास वाढू शकतो. ॲसिडीटी कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात झोप आवश्यक आहे. दररोज झोपण्‍याची वेळ आणि सकाळी उठण्‍याची वेळ समान असली पाहिजे. यामुळे शरीराचं घड्याळ सेट होतं आणि अवयवांचे कार्य सुरळीत पार पडतं.

आहारावर लक्ष ठेवा

झोपण्‍यापूर्वी मसालेदार पदार्थांचे किंवा अतिप्रमाणात आहार सेवन करणे टाळा. झोपण्‍यापूर्वी किमान तीन तास अगोदर रात्रीचे जेवण घ्या. ज्‍यामुळे अन्‍नपचन योग्‍यप्रकारे होईल आणि ॲसिडीटीला कारणीभूत ठरणारं ॲसिड रिफ्लक्‍सचा कमी होतं. एकाचवेळी जास्त जेवण्यापेक्षा दिवसभरात थोडं थोडं खाल्यास ॲसिडीटीचा त्रास कमी होतो. चॉकलेट, लिंबूवर्गीय फळे व टोमॅटो यांसारख्‍या ॲसिडीटी वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळा. तसेच झोपण्‍यापूर्वी मद्यपान व कॅफीन घेणं टाळा

advertisement

जीवनशैलीत बदल करा

ताण तणावामुळे ॲसिडीटी वाढू शकते, नियमित व्‍यायाम आणि मानसिक आरोग्‍य उत्तम राखणाऱ्या योगासनांद्वारे तणावाचे उत्तमप्रकारे व्‍यवस्थापन करा. नियमित शारीरिक व्‍यायाम उत्तम ठरू शकतो, मात्र झोपण्‍यापूर्वी अधिक प्रमाणात व्‍यायाम करणे टाळा. झोपण्‍यापूर्वी मनात अधिक विचार करू नका.

'तुम्हाला जास्त थंडी वाजतेय; कारणीभूत आहेत ‘हे’ आजार, दुर्लक्ष करणं पडेल महागात'

advertisement

गरज असल्‍यास डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या

तुम्‍हाला सतत गॅस्ट्रिक ॲसिडीटीचा त्रास होत असेल तर वैयक्तिक मार्गदर्शन आणि उपचारांसाठी डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या. ते तुम्हाला योग्य ती औषधं आणि जीवनशैलीत बदल सुचवतील ज्यामुळे तुमचा ॲसिडीटीचा त्रास कमी होऊ शकेल. अपुऱ्या झोपेमुळे ॲसिड रिफ्लक्‍स, तसेच थकवा, चिडचिड असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ॲसिडीटीला वेळीच रोखणं गरजेचे आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तुम्हाला सतत ॲसिडीटी होते? करा ‘हे’ सोपे प्रकार, ॲसिडीटीला सारा दूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल