विंटर डायरिया म्हणजे काय?
विंटर डायरिया किंवा कोल्ड डायरिया हा हिवाळ्यात आढळून येणारा अतिसाराचा एक प्रकार आहे. विंटर डायरिया हा विषाणूजन्य आजार असून त्यासाठी क्लॅपसेला,एन्टरोव्हायरस, झोयाट्रोव्हायरस आणि ई.कोलाय हे विषाणू कारणीभूत आहेत. हिवाळ्यात तहान कमी लागते त्यामुळे लहान मुलं पाणी पित नाहीत. त्यात अतिसारामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे अशक्तपणामुळे ते आजारी पडू शकतात.
advertisement
उपचार
तज्ज्ञांच्या मते जर तुमचं बाळ विंटर डायरियामुळे आजारी पडलं किंवा त्याला विंटर डायरियाची लक्षणं दिसून आली तर त्यांना आधी ओआरएस (ORS) देऊन त्यांचं शरीर हायड्रेट करण्याचा प्रयत्न करा. त्यांना मूग डाळ खिचडी किंवा वरणभात असे पचायला हलके पदार्थ द्यावेत. थेट अँटिबायोटिक्स औषधं देण्याआधी डॉक्टरांच्या सल्ला नक्की घ्या.
विशेष काळजी
हिवाळ्यातली कोरडी हवा आणि गारव्यामुळे लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला या साध्या आजारांसह न्यूमोनियासारख्या गंभीर आजाराची भीती असते. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत जेव्हा हवेत गारवा अधिक असतो तेव्हा त्यांना बाहेर पडू देऊ नका. याशिवाय त्यांना गर्दीच्या ठिकाणी नेणं टाळावं. ज्या नवजात बालकाचं वय 6 महिन्यांपेक्षा कमी आहे अशांना तर घराबाहेर घेऊन जाऊच नका. ज्या मुलांचं वजन कमी आहे किंवा ज्यांना दमा, ॲलर्जी, अस्थमा आहे अशा मुलांवर पालकांनी विशेष लक्ष द्यावं. वृद्धांनी देखील थंड हवेत घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करावा. डोके, कान, नाक झाकलेलं ठेवल्यास संक्रमणाचा धोका टळू शकतो.