TRENDING:

Mumbai Shopping: मेगा सेलचा बाप! कोणतीही वस्तू घ्या फक्त 100 रुपयांत, मुंबईत खरेदीसाठी रांगा!

Last Updated:

Mumbai Shopping: मुंबईत घरगुती वापराच्या वस्तू खरेदीसाठी एका दुकानात मोठी गर्दी होतेय. इथं सगळ्या वस्तू फक्त 100 रुपयांत मिळतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्या महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अगदी साध्या गृहपयोगी वस्तूंनाही आता दुप्पट-तिप्पट दर मोजावा लागतो. अशा काळात जर तुम्हाला स्वयंपाकघरातील आणि घरातील रोजच्या वापराच्या वस्तू अगदी कमी किमतीत, म्हणजेच फक्त 100 रुपयांत मिळतात असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. परंतु, मुंबईत होलसेल नव्हे अगदी रिटेल दरात सर्व प्रकारच्या घरगुती वापराच्या वस्तू फक्त 100 रुपयांत मिळत आहेत.
advertisement

बोरिवली रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या 100 सेल या ठिकाणी सध्या एक खास सेल भरवण्यात आला आहे. इथे पाण्याचे टम्बलर, स्टील वॉटर बॉटल्स, टेबल्स, टब, पॅन, स्टीलचे डबे आणि इतर असंख्य वस्तू फक्त 100 रुपयांत उपलब्ध आहेत.

Ganpati Decoration: बाप्पासाठी करा आकर्षक सजावट, मुंबईत फक्त 20 रुपयांपासून पडदे, पाहा लोकेशन

advertisement

स्वयंपाकघरासाठी

या सेलमध्ये किचनसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. ऑफिससाठी स्टीलचे तीन कप्प्यांचे डबे, शाळकरी मुलांसाठी लहान डबे, चार आणि सहा कप्प्यांचे मोठे डबे, तव्यापासून पातेलं, नॉनस्टिक पॅन, काचेच्या व स्टीलच्या डिश, चमचे, पळी आदी वस्तू फक्त 100 रुपयांत मिळतात.

घरगुती वस्तूंसाठी

इथे केवळ किचन नव्हे, तर घरगुती वापराच्या वस्तूंसाठीही भरपूर पर्याय आहेत. प्लास्टिकच्या मोठ्या टब्स, बास्केट्स, कपाटं, लहान-मोठी स्टूल्स, जम्बो साईज पिशव्या, काचेच्या बरण्या, दीड ते पाच किलो क्षमतेचे प्लास्टिकचे डबे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या सर्व वस्तू एका समान किमतीत म्हणजेच फक्त 100 रुपयांत मिळतात.

advertisement

या ठिकाणी तुम्ही कोणतीही वस्तू निवडली तरी तिची किंमत एकसमान – 100 रुपये आहे. विशेष म्हणजे या वस्तू तुम्ही रिटेल आणि होलसेल दरातही त्या-त्या प्रमाणात घेऊ शकता. तुम्ही जर घरासाठी खरेदी करत असाल किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा सेल म्हणजे एक उत्तम संधी आहे. कारण इथे दर्जेदार वस्तू अत्यंत परवडणाऱ्या दरात मिळतात. बोरिवली पूर्व रेल्वे स्टेशनपासून 2 मिनिटांवर असलेल्या कार्टर रोड 7 इथे तुम्हाला 100 सेल हे दुकान मिळेल.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mumbai Shopping: मेगा सेलचा बाप! कोणतीही वस्तू घ्या फक्त 100 रुपयांत, मुंबईत खरेदीसाठी रांगा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल