नाशिक: घरगुती वापरासाठी स्वस्तात मस्त वस्तू घ्यायच्या विचारात असाल तर नाशिकमधील एक ठिकाण आपल्याला माहिती हवंच. डीजीपीनगर येथील माऊली लॉन्सच्या समोर 99 स्टोअर्स नावाचं एक दुकान आहे. इथं फक्त 99 रुपयांत घरगुती वापराच्या सर्व वस्तू मिळतात. गृहिणींचं बजेट न विस्कळीत होता इथं विविध वस्तू खरेदी करता येतात. हे मार्केट नेमकं कुठं आहे आणि इथं कायकाय मिळतं? हेच लोकल18च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
या दुकानात प्लास्टिकचा मोठा 6 कप्पे डब्बा, दागिने मिळतात. तसेच घरात दररोज वापरात येणारा प्लास्टिकचा मोठा टेबल, तीन डब्यांचा सेट, 15 किलो तांदूळ, गहू किंवा पीठ ठेवण्याचा डब्बा देखील फक्त 99 रुपयांत मिळतो. तसेच इथं मायक्रोवेव्हमध्ये ठेवण्यासाठी देखील डब्यांचा सेट मिळतो. तसेच प्लास्टिकच्या इतर वस्तू देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत.
Merry Christmas 2024: नाताळला द्या हटके गिफ्ट, नाशिकमध्ये फक्त 30 रुपयांपासून करा खरेदी
लॉन्ड्री बास्केट, स्टीलचे प्लेट स्टँड, भाजी पोळी ठेवण्यासाठीचे वेगवेगळे कप्पे असलेले स्टीलचे ताट देखील 99 रुपयांमध्ये मिळते. काचेच्या कपांचा सेट, भिंतीला साजेस असं की होल्डर देखील तुम्हाला इथे मिळून जाईल. याशिवाय वेगवेगळ्या प्लास्टिकच्या कपड्यांच्या बॅगा, वन साईट बॅग, सिलिंग बॅग या सगळ्या तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आणि रंगांमध्ये उपलब्ध आहेत. झाडू, मोब सुद्धा तुम्हाला फक्त 99 रुपयांमध्ये मिळतो.
झटपट कांदा कापण्याची मशीन, स्टीमर, मसाला ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे डबे, बार्बेक्यू चिकन फ्राय करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या स्टीलच्या स्टिक्स, पापड फ्राय करण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी, भाजी धुताना वापरण्यात येणारी जाळी, दागिने ठेवण्यासाठी वापरात येणारा लहान बॉक्स असे सर्वच वस्तू तुम्हाला इथे या दुकानात फक्त 99 रुपयांमध्ये मिळून जातील. तसेच शालेय उपयोगी साहित्य देखील या दुकानात उपलब्ध आहे.
दरम्यान, तुम्हाला देखील अगदी स्वस्तात खूप सारी शॉपिंग करायची असेल तर 99 शॉप तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. अगदी होलसेल दरात या ठिकाणी खरेदी करू शकता.





