TRENDING:

Onion Juice : सकाळी रिकाम्यापोटी प्या कांद्याचा ज्यूस, हाय ब्लड प्रेशरची समस्या होईल दूर

Last Updated:

आजकाल हाय ब्लड प्रेशरची समस्या केवळ जास्त वयाच्या व्यक्तींनाच नाही तर तरुणांना देखील होऊ लागली आहे. तेव्हा हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या ज्यूस फायदेशीर ठरू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हाय ब्लड प्रेशर ही सध्या आरोग्याशी निगडित वाढती समस्या आहे. आजकाल हाय ब्लड प्रेशरची समस्या केवळ जास्त वयाच्या व्यक्तींनाच नाही तर तरुणांना देखील होऊ लागली आहे. ब्लड प्रेशर वाढणे आणि कमी होणे या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नसतात. तेव्हा हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या ज्यूस फायदेशीर ठरू शकतो.
कांद्याचा ज्यूस
कांद्याचा ज्यूस
advertisement

ब्लड प्रेशर वाढल्याने छातीत दुखणे, चक्कर येणे, चेहरा लाल पडणे, श्वास घेताना अडचण येणे, थकवा येणे, हृदयाचे ठोके वाढणे, डोकं दुखणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. कांदा हा किचनमध्ये जवळपास प्रत्येक पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो. कांद्याच्या सेवनाचे अनेक फायदे देखील आहेत. सकाळी रिकाम्यापोटी कांद्याच्या ज्यूसचे सेवन केल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकते.

advertisement

Cough Relief : खोकल्यामुळे रात्रभर झोप लागतं नाही? किचनमधील 4 पदार्थांनी मिळेल आराम, लागेल शांत झोप

कांद्याच्या ज्यूसचे फायदे : 

कांद्याचा फ्रेश ज्यूस प्यायल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येऊ शकते. कांद्यात असणाऱ्या क्वेरसेटिन नावाचा फ्लेवोनोइड ऑक्सीडेटिवमुळे शरीराला अनेक लाभ मिळतात. कांद्याच्या ज्यूसमुळे डायबेटिज देखील नियंत्रणात येते. कांद्यात आढळणारे गुणधर्म पचनक्रिया चांगली ठेवण्यास, रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास आणि शरीराला विविध प्रकारच्या इंफेक्शनपासून वाचवण्यास मदत करते. तसेच कांद्याचा ज्यूस हा केसांसाठी देखील फायदेशीर ठरतो.

advertisement

(सदर माहिती ही इंटरनेटवरून मिळालेल्या मजकुरावर आधारित आहे. त्यामुळे आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Onion Juice : सकाळी रिकाम्यापोटी प्या कांद्याचा ज्यूस, हाय ब्लड प्रेशरची समस्या होईल दूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल