शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 मोठी वाटी शेवग्याची पाने, छोटी वाटी हरभरा डाळ, 3 ते 4 लाल मिरची, जिरे, कढीपत्ता, धने, शेंगदाणे, तेल, मीठ, आमचूर पावडर आणि साखर हे साहित्य लागेल.
Chimbori Rassa Recipe : अस्सल झणझणीत, मसालेदार आगरी पद्धतीनं बनवा चिंबोरी रस्सा, रेसिपीचा Video
शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्याची कृती
advertisement
सर्वात आधी गॅसवर कढईत तेल टाकून घ्यायचे आहे. तेल गरम झाले की, जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे तळतळले की, त्यात लाल मिरची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात धने, हरभरा डाळ, शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. हे सर्व साहित्य कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर हे थंड करून घ्यायचं.
तोपर्यंत कढीपत्ता आणि शेवग्याची पाने भाजून घ्यायची आहे. त्याच कढईत उरलेल्या तेलात कढीपत्ता आणि शेवग्याची पाने कुरकुरीत करून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक करू शकता. किंवा पाट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता. वाटून घेताना त्यात मीठ, आमचूर पावडर आणि साखर टाकून घ्यायची आहे. बारीक करून घेतली की, आरोग्यवर्धक अशी चटणी तयार झालेली असेल. कमीत कमी साहित्यात टेस्टी अशी चटणी होते.





