वर्धा : सध्याच्या हंगामात रताळी बाजारात उपलब्ध आहेत. रताळ्याचे पदार्थ विदर्भात अनेकजण आवडीने खातात. त्यातील एक म्हणजे रताळ्याच्या गोड पुऱ्या. या पुऱ्या बनविण्यासाठी रेसिपी अगदी सोप्पी आहे. घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून 15 मिनिटांत ही डिश तयार होते. याबद्दल वर्ध्यातील गृहिणी अश्विनी अंभोरे यांनी माहिती दिली आहे.
रताळ्याच्या गोड पुऱ्या बनवण्यासाठी साहित्य
advertisement
एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी साखर, उकडलेले रताळी, चवीनुसार मीठ, वेलची पूड आणि तळण्यासाठी तेल असे साहित्य लागेल.
रताळ्याच्या गोड पुऱ्या बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम उकडलेल्या रताळ्याची साल काढून घ्यायची आहेत आणि सर्व स्मॅश करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यात गव्हाचे पीठ आणि चवीनुसार मीठ अॅड करून घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. यादरम्यान दूध किंवा पाणी टाकायची गरज नाही कारण उकडलेल्या रताळ्यामध्ये ओलसरपणा असल्यामुळे कणिक त्यात लवकर ॲडजस्ट होते. अशाप्रकारे मऊ गोळा तयार झाला की त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. मध्यम आकाराच्या पुऱ्या कराव्यात. आणि गरम तेलात लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तसेच काही वेळापूर्वी साखरेचा पाक तयार करण्यासाठी ठेवला होता तो पाक तयार झाला की त्यात वेलची पूड अॅड करून गरम तेलातून तळलेल्या पुऱ्या पाकात बुडवून अर्धा मिनिट ठेवून वेगळ्या भांड्यात काढून ठेवायच्या आहेत. अशाप्रकारे रताळ्याच्या गोड चविष्ट पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत.
1 वाटी चण्याची डाळ, 2 चमचे बेसन, 10 मिनिटांत तयार होतील चविष्ट विदर्भ स्टाईल कढी गोळे, रेसिपी पाहा
तर घरातील लहान मुले असो किंवा वृद्ध सर्वांना अवडनारी ही रेसिपी आहे. अशाप्रकारे तुम्हीसुद्धा रताळ्याच्या पुऱ्या ही रेसिपी नक्की ट्राय करा.





