या ज्वेलरी स्टुडिओमध्ये हाताने बनवलेली 'टेराकोटा ज्वेलरी' विक्रीसाठी उपलब्ध आहे. या दागिन्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते सुंदर आणि पारंपरिक असून खिशाला परवडणारे आहेत. मातीची भांडी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट चिकन मातीपासून (टेराकोटा) हे दागिने तयार केले जातात. हे दागिने भारतीय परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम आहेत. पारंपरिक साडी असो किंवा इंडो-वेस्टर्न ड्रेस दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर हे टेराकोटा दागिने शोभून दिसतात. टेराकोटा झुमके आणि टॉप्सची किंमत 100 रुपयांपासून सुरू होते. संपूर्ण ज्वेलरी सेट घेण्याची इच्छा असेल तर, ते 300 ते 800-850 रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहेत.
advertisement
हस्त कौशल्याचा अप्रतिम नमुना
या दागिन्यांमधून आपल्याला भारतीय हस्तकलेचं प्रतिबिंब बघायला मिळतं. प्रत्येक दागिना हा कलाकारांच्या हस्त कौशल्याचा नमुना आहे. दागिन्याच्या प्रत्येक सेटवर हाताने अतिशय नाजूक आणि देखणं रंगकाम केलेलं आहे. मोडस स्टुडिओमध्ये उपलब्ध असलेल्या टेराकोटा दागिन्यांची किंमत एक हजार रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे खिशाला परवडणारी आहे. जर रक्षाबंधनच्या दिवशी भावाने आपल्या लाडक्या बहिणीला हे दागिने भेट दिले तर बहीण नक्कीच आनंदून जाईल.
बहिणींना मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. टेराकोटा ज्वेलरी मातीपासून बनवलेली असल्यामुळे तिला काळजीपूर्वक हाताळावी लागते. पाण्याच्या संपर्कात आल्यास किंवा खाली पडल्यास हे दागिने तुटण्याची शक्यता असते.