संधिवात असेल तर आहाराच्या सवयींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. चुकीच्या आहारामुळे सूज आणि वेदना वाढू शकतात. संधिवाताच्या रुग्णांनी कोणते पदार्थ टाळावेत, जाणून घेऊया.
संधिवात असेल तर हे अन्नपदार्थ खा -
- फॅटी फिश - सॅल्मन, सार्डिन आणि ट्यूनासारख्या माशांमधे ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतं, यामुळे सांध्यांमधली सूज आणि कडकपणा कमी होतो.
advertisement
- हिरव्या पालेभाज्या - पालक, केल आणि ब्रोकोलीमधे व्हिटॅमिन के, सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात, यामुळे हाडं मजबूत आणि सांधे निरोगी राखण्यास मदत होते.
Bones Health : हाडं ठिसूळ करणाऱ्या पदार्थांना करा बाय, लगेचच बदला चुकीच्या सवयी
- बेरी आणि चेरी - स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि चेरी सारख्या फळांमधे अँटिऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन्स असतात. यामुळेही सूज कमी करण्यास मदत होते.
- सुकामेवा - अक्रोड, बदाम, जवस आणि चिया सीड्स हे ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत, यामुळे संधिवाताच्या वेदना कमी करण्यास मदत होऊ शकते.
- हळद आणि आलं - कर्क्यूमिन आणि जिंजरॉलमधे शक्तिशाली दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे वेदना आणि सूज कमी करतात.
- ग्रीन टी - ग्रीन टीमधे असलेले पॉलिफेनॉल सांध्यांच्या संरक्षणासाठी उपयुक्त आहे.
- डाळी आणि बीन्स - राजमा, मसूर आणि हरभरा यात प्रथिनं आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, यामुळे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात.
- ऑलिव्ह ऑइल - ऑलिव्ह ऑइलमधले हेल्दी फॅट्स सूज कमी करण्यासाठी आणि सांधे लवचिक ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.
संधिरोगासाठी सर्वात वाईट अन्न -
लाल मांस - यात सॅच्युरेटेड फॅट्स आणि प्युरिनचं प्रमाण जास्त असतं, यामुळे युरिक अॅसिड वाढून संधिरोगाच्या वेदना वाढू शकतात.
प्रक्रिया केलेले पदार्थ - पिझ्झा, बर्गर, चिप्स आणि पॅकेज्ड स्नॅक्समधे ट्रान्स फॅट्स असतात, यामुळे सूज वाढते.
Morning Routine : हिवाळ्यातली सुस्ती घालवा, व्यायाम करा, आजारांना पळवून लावा
जास्त साखर - गोड पदार्थ, सोडा आणि मिष्टान्न यामुळे शरीरात सूज वाढते आणि लठ्ठपणा वाढतो, ज्यामुळे सांध्यांवर दबाव येतो.
रिफाइंड कार्ब्स - रिफाइंड पीठ, पांढरा ब्रेड आणि पास्ता यामुळे रक्तातील साखर आणि सूज वाढण्याची शक्यता जास्त असते.
अति मीठ - जास्त मीठामुळे शरीरातील कॅल्शियम कमी होतं आणि हाडं कमकुवत होतात.
अल्कोहोल - अल्कोहोलमुळे युरिक अॅसिडची पातळी वाढते, ज्यामुळे संधिवाताच्या वेदना वाढू शकतात.
जास्त तळलेले पदार्थ - तळलेल्या पदार्थांमधे ट्रान्स फॅट्स असतात, ज्यामुळे शरीरात सूज आणि लठ्ठपणा वाढतो.
