तुम्हाला देखील अशाच पारंपरिक बांगड्या खरेदी करायच्या असतील तर मुंबईतील प्रसिद्ध भुलेश्वर मार्केटमधील 'मजीशा बँगल्स' हे ठिकाण उत्तम पर्याय ठरू शकतो. या ठिकाणी फक्त 15 रुपयांपासून विविध प्रकारच्या बांगड्या उपलब्ध आहेत. या ठिकाणी विविध प्रकारच्या आणि डिझाईनच्या बांगड्या होलसेल दरात मिळतात.
advertisement
बांगड्यांचे विविध प्रकार
मोत्यांच्या बांगड्या: या महाराष्ट्रातील पारंपरिक बांगड्या आहेत. मंगळागौरीच्या पूजेसाठी आणि कार्यक्रमांसाठी भरजरी साडीसोबत अनेकजणी मोत्यांच्या बांगड्या घालतात. मोत्यांच्या बांगड्यांची किंमत 55 ते 60 रुपयांपासून सुरू होते.
चुडा: या बांगड्या लग्नसमारंभासाठी खास डिझाइन केल्या जातात. आपल्या महाराष्ट्रामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या चुडा म्हणून वापरल्या जातात. अनेक स्त्रिया सणाच्या दिवशी देखील चुड्यातील हिरव्या बांगड्या घालतात.
डेली वेअर बांगड्या: दररोजच्या वापरासाठी अवघ्या 15 रुपयांपासून बांगड्या उपलब्ध आहेत. तर फॅन्सी बांगड्यांची किंमत 60 ते 65 रुपयांपासून आणि मायक्रो प्लेटेड बांगड्यांची किंमत 60 ते 65 रुपयांपासून सुरू होते.
ऑक्सिडाइज्ड ब्रेसलेट पॅटर्न बांगड्या: या प्रकारच्या बांगड्या कुर्ती आणि वेस्टर्न ड्रेसेसवर शोभून दिसतात. या बांगड्या सध्या ट्रेंडिंग आहेत. शिवाय रोजच्या वापरासाठी देखील त्या योग्य आहेत.
थ्रेडवर्क बांगड्या: रेशीमाच्या धाग्यांनी सजवलेल्या या बांगड्या वजनाला हलक्या आणि आकर्षक असतात.
व्यवसायासाठी उत्तम संधी
ज्या स्त्रियांना कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी बांगड्यांचा व्यवसाय हा एक चांगला पर्याय आहे. कमी पैशांची गुंतवणूक करून चांगला नफा मिळवता येऊ शकतो. 'मजीशा बँगल्स'मध्ये सुमारे 10000 पेक्षा अधिक डिझाईन्स उपलब्ध आहेत.