TRENDING:

Rakshabandhan Gift: रक्षाबंधनला बहिणीसाठी स्वस्तात गिफ्ट हवंय? मुंबईत इथं फक्त 150 रुपयात करा बॅग खरेदी, Video

Last Updated:

रक्षाबंधनला बहिणीसाठी स्वस्तात मस्त आणि उपयोगी भेट शोधत असाल, तर तुमच्यासाठी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट खास ठिकाण आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : श्रावण महिन्याचे आगमन झालं की सणांची रेलचेल सुरू होते. नागपंचमी नंतर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते रक्षाबंधनकडे. या खास दिवशी बहिणीला एखादी सुंदर भेटवस्तू द्यायची आणि तिचा आनंद द्विगुणित करायचा, असा भावाचा प्रयत्न असतो. यंदा जर तुम्ही स्वस्तात मस्त आणि उपयोगी भेट शोधत असाल, तर तुमच्यासाठी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट खास ठिकाण आहे.
advertisement

क्रॉफर्ड मार्केटमध्ये लोहार चाळ परिसरात एक असे दुकान आहे जिथे फक्त दीडशे रुपयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स मिळतात. या बॅग्स केवळ स्वस्त नाहीत तर त्यांची क्वालिटीही उत्तम आहे. या बॅग्स बहिणीच्या रोजच्या वापरासाठी, ऑफिससाठी, पार्टीसाठी किंवा प्रवासासाठी अगदी परफेक्ट आहेत.

Electricity Saving: विज बिल येईल कमी, पुण्यातील इंजिनिअरची कमाल, बनवले बचत करणारे खास यंत्र, Video

advertisement

या दुकानात मिळणाऱ्या बॅग्सचे प्रकार खालीलप्रमाणे:

मेकअप बॅग्स: बहिणीच्या सौंदर्यसामग्रीसाठी छोट्या, स्टायलिश बॅग्स

पार्टी क्लचेस: खास प्रसंगी वापरता येतील अशा चमकदार आणि आकर्षक डिझाईन्स

कॉर्पोरेट ऑफिस बॅग्स: ऑफिसला नेण्यासाठी योग्य अशा सॉलिड आणि प्रोफेशनल लूक असलेल्या बॅग्स

शॉपिंग बॅग्स: रोजच्या वापरासाठी हलक्या वजनाच्या आणि स्टायलिश बॅग्स

ट्रॅव्हल पाउच आणि प्लास्टिक बॅग्स: प्रवासासाठी सोयीस्कर, टिकाऊ प्लास्टिक आणि फोल्डेबल बॅग्स

advertisement

फॅन्सी पर्स: लग्न, सोहळ्यांमध्ये वापरता येतील अशा सुंदर डिझाईनच्या पर्स

या बॅग्समध्ये वापरलेलं कापड आणि प्लास्टिक टिकाऊ असून लाँग लास्टिंग आहे. त्यामुळे तुम्ही कमी किमतीत दर्जेदार गिफ्ट घेऊ शकता.

कुठे मिळणार या बॅग्स?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST) स्थानकावर उतरल्यानंतर क्रॉफर्ड मार्केटकडे जा. तिथे लोहार चाळ परिसरात, कोपऱ्यावर हे बॅग्सचं दुकान आहे. दुकान अगदी ओळखण्यासारखं असून तुम्हाला तिथे तुमच्या पसंतीची बॅग सहज मिळेल.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Rakshabandhan Gift: रक्षाबंधनला बहिणीसाठी स्वस्तात गिफ्ट हवंय? मुंबईत इथं फक्त 150 रुपयात करा बॅग खरेदी, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल