या बाजाराची खासियत म्हणजे येथे मिळणारे अत्यंत परवडणारे दर. हिवाळ्यात लागणाऱ्या अनेक वस्तूंची सुरुवात केवळ 50 रुपयांपासून होते. विविध रंग, आकार आणि आकर्षक डिझाइन्समुळे ग्राहकांना विशेष पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे येथे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.
कष्टाचं चीज झालं! हजारो रूपयांपासून सुरू केलेला ‘वन-स्टॉप’ सेंटरचा व्यवसाय लाखाच्या घरात
advertisement
कानटोपी 50 ते 200 रुपयांपर्यंत, तर लहान-मोठ्यांसाठी स्वेटर्स 450 रुपयांपासून अगदी 1000 रुपयांपर्यंत विविध दरांत मिळतात. पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र आणि आकर्षक कलेक्शन उपलब्ध आहे. जॅकेट्सची किंमत 500 ते 1200 रुपयांपर्यंत असून थंडीपासून बचाव करणारे हातमोजे 100 ते 250 रुपयांच्या दरम्यान मिळतात. पायमोजे 50 ते 200 रुपयांत तर मफलर 150 ते 250 रुपयांत उपलब्ध आहेत.
थंडीची चाहूल लागताच स्वस्त आणि दर्जेदार कपड्यांच्या शोधात असलेले अनेक मुंबईकर या मार्केटकडे धाव घेत आहेत. विविध पर्याय व खिशाला परवडणारे दर यामुळे परेलचे हे स्वेटर मार्केट दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे.





