अहिल्यानगर : आपल्या देशातील अनेक तरुण परदेशात शिक्षण घेतल्यानंतर चांगली संधी मिळाल्यास त्याच देशात स्थायिक होतात. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द या छोट्याशा गावातील रावसाहेब घुगे या तरुणाने शिक्षण झाल्यानंतर स्वतःच्याच गावामध्ये बाप नावाची आयटी कंपनी सुरू केली आहे. गायीच्या गोठ्यामध्ये सुरू झालेली ही आयटी कंपनी आता तब्बल 600 एम्प्लॉईची झाली असून देशातील मोठमोठ्या मेट्रो शहरातील आयटी कंपन्या देखील बाप कंपनी सोबत काम करण्यास उत्सुक आहेत. एका छोट्याशा खेडेगावातून सुरू झालेला बाप या आयटी कंपनीचा प्रवासाबद्दल पाहुयात.
advertisement
पारेगाव सारख्या एका छोट्या दुष्काळी खेड्यामध्ये अमेरिकेतून येऊन रावसाहेब घुगे यांनी ही बाप नावाची आयटी कंपनी गेल्या अडीच वर्षापूर्वी सुरू केली होती. जे गाव अजून पाण्यासाठी टँकर वरती डिपेंड आहे जिथे फक्त पावसाळी पाण्यावर शेती केली जाते. ज्याचे रस्ते अजूनही चांगले नाही त्या गावांमध्ये दहा-बारा कोटी इन्व्हेस्ट करण्याचं धाडस करणारा हा युवक, आज त्याच गावामध्ये आणखी एक मोठी कंपनी आणण्यामध्ये यशस्वी झाला आहे.
राजमा शेतीमुळे शेतकऱ्याचे नशीब चमकलं, अडीच महिन्यात घेतलं लाखोंचं उत्पन्न
कॉमसेन्स टेक्नॉलॉजी नावाची पुण्यातील एक नावाजलेली आयटी कंपनी जी सेल्स फोर्स नावाच्या मोठ्या कंपनीची इम्प्लिमेंटेशन पार्टनर आहे. त्या कंपनीने मागील आठवड्यात पारेगावमध्ये येऊन जवळजवळ 35 शेतकऱ्यांच्या मुलांची निवड आपल्या कंपनीसाठी केलेली आहे. विशेष म्हणजे ही कंपनी बाप कंपनीच्या कॅम्पसमध्ये या मुलांना रोजगार देणार आहे. म्हणजे आता पारेगावमध्ये दोन आयटी कंपन्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्यासाठी सज्ज झालेले आहेत.
रावसाहेब घुगे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं की, खेड्यामध्ये पुढील पाच वर्षात आम्हाला पाच हजार लोकांना रोजगार द्यायचा आहे. अनेक कंपन्यांना इथे येण्यासाठी प्रेरित करायचा आहेत. खेड्याच्या उद्धारासाठी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ही एक मोठी पर्वणीच असणार आहे.
खेड्याकडे चला या गांधीजींच्या मंत्राला पूर्णपणे न्याय देत बाप कंपनी आणि त्यांच्या टीमने ग्रामीण भागासाठी विशेषतः संगमनेर तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांसाठी अनेक लोक उपयोगी प्रयोग गेल्या काही वर्षात केलेले आहेत. खेड्यामध्ये रोजगार करून देण्यात व्यतिरिक्त शेतकऱ्यांना योग्य त्या दरात शेती उपयोगी वस्तू आणून देणे आणि आता शेतकऱ्यांची स्वतःची बाजार समिती असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्स बाप कंपनी सुरू करत आहे.





