अमरावतीवरून गाडी सुटण्याची वेळ
अमरावतीसह अकोला, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांतील प्रवासी मोठ्या प्रमाणात या गाडीतून प्रवास करतात. अमरावती-तिरुपती (गाडी क्रमांक 12766) ही एक्सप्रेस सोमवार व गुरुवारी सकाळी 6.45 वाजता अमरावतीवरून सुटते आणि 8 वाजता अकोल्यात पोहोचते. हीच गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 6.25 वाजता तिरुपती स्थानकावर दाखल होते.
Mumbai Local: लोकलच्या गर्दीवर कायमचा उपाय! मध्य रेल्वेचा गेमचेंजर प्लॅन, काम सुरू!
advertisement
परतीचा प्रवास
परतीच्या प्रवासासाठी तिरुपती-अमरावती एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12765) मंगळवार, गुरुवार व शनिवारी दुपारी 3.45 वाजता तिरुपतीहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3.10 वाजता अमरावतीत पोहोचते.
प्रवाशांच्या मागणीमुळे सेवा पुन्हा अमरावतीहून
काही काळ अमरावती-तिरुपती एक्सप्रेसचा प्रारंभ बिंदू अमरावतीऐवजी अकोला करण्यात आला होता. मात्र, त्यामुळे भाविकांसह चाकरमान्यांना मोठी गैरसोय होत होती. सततच्या पाठपुराव्यानंतर मध्य रेल्वेने ही सेवा पुन्हा अमरावती येथून सुरू केली. त्यामुळे सकाळी कार्यालयाला जाणाऱ्या चाकरमान्यांना, विद्यार्थ्यांना तसेच तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रवाशांची पहिली पसंती बनलेली सेवा
तिरुपती दर्शनासाठी जाणाऱ्या बहुतेक भाविकांचा पहिला पर्याय हीच एक्सप्रेस ठरली आहे. दर्शन आटोपल्यानंतर हीच गाडी मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी परतीसाठी उपलब्ध असल्याने भाविकांचा प्रवास सुलभ होतो.






