गोपीनाथ रघुनाथ दांगोडे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव तो छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्ष येथील अल्पभूधारक शेतकरी होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि ४ मुली असा परिवार आहे.
जालना शहरात धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. पण सरकारने अद्याप त्याची योग्य दखल घेतली नाही. यामुळे गोपीनाथ दांगोडे हा मानसिक तणावात होता. मंगळवारी मध्यरात्री त्यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
advertisement
काय आहे सुसाईड नोटमध्ये?
पोलिसांना मृतदेहाजवळ आढळलेल्या सुसाईड नोटमध्ये गोपीनाथ दांगोडे यांनी आपण धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख आहे. मी गोपीनाथ रघुनाथ दांगोडे. आम्हाला धनगर समाजास आरक्षण मिळत नाही. म्हणून मी बलिदान देत आहे. मुख्यमंत्री साहेब, माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये. धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे, असे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.