धाराशिव : बहुरुपी महाराष्ट्रातील ही एक लोककला आहे. अगदी गाव खेड्यात वाड्यावर फिरून पोलिसांच्या वेषात लोकांचं मनोरंजन करणारी बहुरुपी ही कला एकेकाळी फार कुतूहल वाटायचे. अगदी ऐतिहासिक कालखंडापासून बहुरुपी ही लोककला चालत आली. मात्र, शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही कला आजच्या आधुनिक युगात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
आजही गाव खेड्यात क्वचित बहुरुपी आढळतात. पोलिसांचा वेश धारण करून गावभर मनोरंजन करतात आणि त्या बदल्यात लोक त्यांना धान्य किंवा पैसे देतात. एकेकाळी ही गाव गाड्यातली ऐतिहासिक वारसा असलेली परंपरा मानली जायची. मात्र, आज चित्रपट गृह आणि करमणुकीचे साधन वाढल्याने या बहुरुपी कलेकडे दुर्लक्ष होत आहे.
advertisement
आजच्या या आधुनिक युगात धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील अनिल शेगर यांनी हा बहुरुपी व्यवसाय आजही पुढे चालू ठेवला आहे. खरे तर महाराष्ट्राला इतिहासाचा आणि संस्कृतीचा फार मोठा वारसा लागला. त्यातीलच बहुरुपी ही एक कला जोपासणे गरजेचे आहे. बहुरुपी लोकांना चांगली वागणूक देणे, गावात आलेल्या बहुरुपी व्यक्तीला समजून घेणे महत्त्वाचे आहे.
तसेच कोणत्याही अडचणींशिवाय बहुरपी समाज जगला तरच ही कला अबाधित राहील अन्यथा बहुरुपी लोक कलाकारांच्या पुढच्या पिढ्या या व्यवसायात येण्यास धजावणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.