हे दुकान ग्रँट रोड स्टेशनपासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असून, गेली अनेक वर्षे येथे गौरी गणपतीसाठी लागणारे सर्व साहित्य भक्तांना मिळत आहे. त्यामुळे अनेक घरगुती तसेच मंडळस्तरीय भाविक या दुकानाला पसंती देतात. दुकानदार सम्राट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुकानात मिळणाऱ्या फायबरच्या वस्तूंवर एक वर्षाची हमी दिली जाते. त्यामुळे वापरादरम्यान तडे जाणे किंवा तुटणे याची भीती नसते. हे साहित्य अनेक वर्षे वापरता येतं.
advertisement
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना तुम्हीही करताय का चुका? या नियमांचं करा पालन
साहित्य आणि दर
गौरीचे मुखवटे: खळीचे, अमरावतीचे स्पेशल, चंद्रकोर किंवा टिकली असलेले अशा विविध प्रकारचे मुखवटे येथे 1500 पासून मिळत आहेत.
गौरीची फायबर बॉडी: झिरो-मेंटेनन्स तसेच स्क्रू-फिटिंग पर्यायात उपलब्ध असलेल्या या बॉडीवर स्वतः दागिने वापरता येतात. काही मॉडेल्समध्ये आधीच दागिने बसवलेले आहेत.
गौरीचे हात-पाय: कापडी हात फक्त 200 पासून तर फायबरचे हात व पाय 350 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
गौरीचं बाळ: फायबर व कापडी स्वरूपात असलेली बाळं 200 रुपयांपासून मिळत आहेत.
दागिने: नेकलेस, ठुशी, चोकर, कोल्हापुरी साज, मोत्यांच्या माळा, बांगड्या, नथ इत्यादी दागिने फक्त 40 रुपयांपासून मिळत आहेत.
गौरीचे फेटे: विविध रंगसंगतीत, ₹300 पासून.
गौरीगणपतीचा सण जवळ आल्याने सध्या दुकानात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. काही भक्त आपल्या आवडीचे मुखवटे व दागिने निवडताना तर काही सार्वजनिक मंडळं मोठ्या प्रमाणात होलसेल खरेदी करताना दिसतात. कमी दर, विविधता आणि टिकाऊपणा यामुळे गिरगावातील हे दुकान सध्या भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र बनलं आहे.