अनेकजण नाताळपासून ते 31 डिसेंबरपर्यंत खास पार्ट्यांचं आयोजन करतात. थर्टी फर्स्टची रात्र अविस्मरणीय करण्याचा बेत अनेकांचा असतो. त्यामुळे नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी 24 ते 31 डिसेंबरपर्यंत नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहनचालकांची तपासणी केली जाणार असून विनापरवाना मद्य घेतलेल्या आणि वाहन हाकणाऱ्या चालकांविरोधात कारवाई होणार आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे थर्टी फस्टला नियम मोडल्यास हॅप्पी न्यू इयर तुरुंगात साजरा करावा लागू शकतो.
advertisement
बालपणीची मैत्री, लॉकडाऊनमध्ये घेतला निर्णय, रौनक आणि देविना कसे झाले युवा उद्योजक?
रात्री एक पर्यंत हॉटेल्स सुरू
थर्टी फर्स्टच्या उत्साहावर विरजण पडू नये म्हणून राज्य सरकारने महानगरांत पहाटे 5 वाजेपर्यंत मद्यविक्रीस परवानगी दिलीये. तर इतर ठिकाणी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मद्यविक्री करता येईल. त्यामुळे 31 डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत देशी, विदेशी मद्य व बियर बार सुरू राहणार आहेत.
दारू पिऊन वाहन चालवल्यास..
मद्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू असली तरी दारू पिऊन गाडी चालवणे महागात पडणार आहे. तसे आढळल्यास चालकावर गुन्हा दाखल होतो. मद्यपी चालकाचा खटला खटला पाठविला जातो. तिथे 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. मद्यपी चालकाला किमान 6 महिन्यापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. तसेच परवाना देखील 3 ते 6 महिन्यांसाठी निलंबित होतो.
लहान मुलांना मद्य विक्री केल्यास..
मद्य परवाना असल्याशिवाय कुणालाही मद्य देऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. नियम डावलून लहान मुलांना मद्य विक्री केल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मद्य पार्ट्यांमध्ये देखील लहान मुलांचा सहभाग नको, असे निर्देश देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत.






