TRENDING:

अर्रर्र...पोलीस व्हायला आला अन् थेट जेलमध्ये गेला! भरतीत घडलं काय?

Last Updated:

जालन्यात 125 पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी दिनांक 19 जूनपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली. यंदा 6 हजार 978 अर्ज आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
125 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे.
125 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे.
advertisement

जालना : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. या दरम्यान काही उमेदवारांकडून गैरप्रकार समोर येतात. जालना जिल्ह्यातही असाच एक प्रकार उघडकीस आला. कोल्हापूर येथील तरुणाला कागदपत्र सादर करताना प्रमाणपत्रावरील खडाखोड महागात पडली. त्याला थेट जेलची हवा खावी लागली.

जालन्यात 102 पोलीस शिपाई आणि 23 पोलीस चालक अशा एकूण 125 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. सध्या या भरतीची मैदानी चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. याच भरतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सोमवार पेठ इथला अविनाश अशोक माने हा तरुण आला होता. त्याच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, प्रमाणपत्र प्रदान केल्याची तारीख 20 जून 2024 अशी होती. मात्र त्यानं शहरातील आई मल्टी सर्व्हिसेसच्या चालकाकडून कॉम्प्युटरवर 15 एप्रिल 2024 अशी बनावट कागदपत्र तयार केली. हा प्रकार उघडकीस येताच या तरुणावर कडक कारवाई करण्यात आली.

advertisement

हेही वाचा : police bharati 2024 : धक्कादायक वास्तव! पोलीस भरतीसाठी इंजीनिअर, एमबीएच्या विद्यार्थ्यांनी केले अर्ज

शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात उमेदवार अविनाश माने आणि आई मल्टी सर्व्हिसेसच्या चालकाविरोधात भादवी कलम 420, 465 आणि 468 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिणामी पोलीस भरतीसाठी आलेल्या या तरुणाला एका चुकीमुळे आता थेट जेलची हवा खावी लागलीये.

advertisement

दरम्यान, जालन्यात 125 पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी दिनांक 19 जूनपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली. यंदा 102 पोलीस शिपाई पदांसाठी 4 हजार 071 आणि 23 पोलीस शिपाई चालक पदांसाठी 2 हजार 907 असे एकूण 6 हजार 978 अर्ज आले आहेत. त्या अनुषंगानं ही परीक्षा घेण्यात येतेय.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
अर्रर्र...पोलीस व्हायला आला अन् थेट जेलमध्ये गेला! भरतीत घडलं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल