जालना : राज्य शासनाने एक जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेविषयी महिला वर्गात उत्सुकता आहे. तर त्याचबरोबर अनेक बाबतीमध्ये संभ्रमही आहे.
महिला या योजनेचा फॉर्म ऑनलाईनच्या माध्यमातून नारीशक्ती दूत नावाच्या महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या ॲपवरूनही भरू शकतात. लाभार्थी महिला स्वतः अँड्रॉइड मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून हा अर्ज भरू शकतात. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी राहणार आहे, हेच आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
सर्वप्रथम आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरील प्ले स्टोअरमधून नारीशक्ती दूध नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावे. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकून लॉगइन करायचा आहे. लॉगइन केल्यानंतर तुम्हाला एक चार अंकी ओटीपी येईल. तो ओटीपी भरून पुन्हा लॉगइन केल्यानंतर टर्म आणि कंडिशन लास्ट ॲकसेप्ट करायच्या आहेत.
इतकी प्रक्रिया पार पडल्यानंतर तुम्हाला स्वतःचं प्रोफाइल तयार करण्यासाठी विचारलं जाईल. लाभार्थी महिलेचे नाव, पतीचे नाव, ई-मेल क्रमांक, मोबाइल क्रमांक टाकून स्वतःचं प्रोफाइल लाभार्थी महिला तयार करून घेऊ शकतात. प्रोफाइल तयार केल्यानंतर ते जतन म्हणजे सेव्ह करायचे आहे. सेव्ह झालेले प्रोफाइल तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर दिसेल. इतकी सगळी प्रक्रिया झाल्यानंतर तुमचा महत्त्वाचा एक टप्पा पूर्ण होईल.
पावसात अंघोळ करणे किती फायद्याचं की तोट्याचं?, अनेकांना माहिती नसेल, नेमकं काय करावं?
यानंतर ॲपच्या होम बटनावर क्लिक केल्यानंतर त्याच्या बाजूलाच असलेल्या योजना या बटणावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला हमीपत्र डाऊनलोड करण्याचा ऑप्शन दिसेल. हमीपत्र डाऊनलोड केल्यानंतर पुन्हा एकदा होम बटणावर क्लिक करावे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या टॅबवर क्लिक करावे. यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज उपलब्ध होईल.
या अर्जात असलेली संपूर्ण माहिती तुम्हाला त्यामध्ये भरायची आहे. यामध्ये वैयक्तिक माहिती, बँकेचा तपशील, शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेतला आहे का, याबाबतची माहिती, वैवाहिक स्थिती, लाभार्थी पर राज्यातील आहे का, याबाबतची माहिती विचारली जाईल.
सगळी माहिती भरल्यानंतर केल्यानंतर तुम्हाला योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करायची आहेत. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदाराचा फोटो, असा ऑप्शन शेवटी असेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल फोनचा कॅमेरा ओपन होईल. या कॅमेर्याने लाभार्थ्याचा फोटो घ्यायचा आहे. हा फोटो घेतल्यानंतर तुम्हाला खाली सहमती बटणावर क्लिक करायचे आहे.
सहमती दिल्यानंतर तुमचा अर्ज जतन होईल. तो अर्ज तुम्ही पाहू शकणार आहात. अर्जातील माहिती बरोबर असल्यानंतर तुम्हाला हा अर्ज फायनल सबमिट करायचा आहे. तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा एक चार अंकी ओटीपी येईल. हा ओटीपी भरून तुम्ही तुमचा फॉर्म व्हेरिफाय करू शकता. ओटीपी टाकून व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा अर्ज शासनाकडे सबमिट होईल. अशा पद्धतीने महिला लाभार्थी स्वतः नारी शक्ती दूत या ॲपवरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करू शकतात.