कोल्हापूर : कलाकाराला आपली कला कोणत्याही माध्यमातून व्यक्त करता येत असते. त्यात बरेच कलाकार मायक्रो आर्ट अवगत करू लागले आहेत. अशाच पद्धतीने कोल्हापुरातील एका कला शिक्षकाने बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मायक्रो आर्ट करत अवघ्या 4 सेंटीमीटर खडूवर गौतम बुद्धांची प्रतिमा साकारली आहे. यातून संतोष कांबळे यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्धांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.
advertisement
पेशाने कलाशिक्षक असले तरी आपली कला वेगवेगळ्या पद्धतीने इतरांपर्यंत पोहोचवण्याचे काम संतोष कांबळे करत आहेत. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले गावचे संतोष कांबळे हे पेठ वडगाव येथील बळवंतराव हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शाळेत कलाशिक्षक असल्यामुळे फळा आणि खडू यांच्याशी त्यांची रोजच भेट होते. मात्र याच रंगीत खडू व फळा यांच्या माध्यमातून विविध चित्र कलाकृती साकारून त्यांनी एक कलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. त्याचबरोबर मोरपिसावर, साबणावर अशा विविध गोष्टींवरही अनेक छोट्या कलाकृती त्यांनी साकारल्या आहेत. त्यातच आता बुद्ध पोर्णिमेनिमित्त आपल्या कलाविष्कारातून तथागत भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करण्यासाठी हे शिल्प त्यांनी साकारले आहे
कोल्हापुरातील डॉक्टरांचं अनोखं संगीत प्रेम, कसा तयार केला जगातील सर्वात लहान तानपुरा? Video
कसे साकारले शिल्प?
खडूवर एखादी कलाकृती साकारणे हे अत्यंत कठीण गोष्ट आहे. मात्र अगदी सूक्ष्म पद्धतीने सुईच्या मदतीने संतोष यांनी हे शिल्प साकारले आहे. साधारणपणे 4 सेंटीमीटर म्हणजेच दीड इंच आकाराचे आहे. पांढऱ्या रंगाचा हा खडू असून त्यावर बोधिवृक्षाखाली बसलेले भगवान गौतम बुद्ध साकारण्यात आले आहेत. अगदी छोटे छोटे बारकावे या शिल्पात टिपण्यात आले आहेत. त्यामुळेच साधारण तीन तासांचा वेळ हे शिल्प साकारण्यासाठी लागला असे ही संतोष यांनी सांगितले.
दीड किलो वजनाचा वनराज आंबा ठरतोय आकर्षण, कोल्हापुरातील महोत्सवात तब्बल 47 प्रकारचे आंबे Video
कोणकोणत्या साकारल्या कलाकृती?
आजवर संतोष यांनी विविध कलाकृती साकारलेल्या आहेत. यामध्ये स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, बाजीप्रभू देशपांडे, भगवान श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमान, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम विठ्ठल रुक्मिणी आदी देवदेवता, अनेक महापुरुष, नेतेमंडळी तसेच अनेक मानवाकृती हुबेहूब खडूमध्ये संतोष यांनी कोरल्या आहेत. तर खडूबरोबरच आंघोळीच्या साबणामध्ये, मोरपिसावर, विविध झाडांच्या पानांवर त्यांनी अत्यंत विलोभनीय कलाकृती साकारलेल्या आहेत. तसेच कोणतीही जयंती किंवा पुण्यतिथी असल्यास शाळेच्या फलकावर फक्त खडूच्या साहाय्याने हुबेहूब प्रतिकृती रेखाटण्यात संतोष यांचा हातखंडा आहे.