TRENDING:

चांदीची प्रभावळ अन् सोन्याचे अलंकार, कसा आहे कोल्हापुरातील सुवर्ण गणपती!

Last Updated:

सध्या राज्यात गणेशोत्सवाची धूम असून प्रत्येक गणेश मंडळाची काही खास वैशिष्ट्ये असतात. कोल्हापुरात असाच एक सुवर्ण गणपती सर्वांचे लक्ष वेधतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर, 26 सप्टेंबर: सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती बाप्पांना सोन्या चांदीचे दागिने चढवले जातात. काही ठिकाणचा बाप्पा तर पूर्णपणे दागिन्यांनी मढवलेला असतो. कोल्हापुरातील एका गणेश मंडळाचा बाप्पा देखील सुवर्ण गणपती अशी आपली ओळख ठळक करताना दिसत आहे. या गणपतीच्या अंगावर असणारे सर्व दागिने सोन्याचे असून मागे चांदीची प्रभावळ असते.
advertisement

कोल्हापूरच्या टाकाळा परिसरात दि गणेश फ्रेंड्स सर्कल (एस एफ ग्रुप) हे मंडळ आहे. 1986 साली स्थापन झालेले हे मंडळ सुरुवातीपासून अगदी उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आलेले आहे. या मंडळाच्या आसपासच्या परिसरात असणाऱ्या नागरिकांनी देवाकडे आपल्या इच्छा मागायला सुरुवात केली. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या या बाप्पाला मिळणारी देणगी पुढे वाढत गेली. त्यामुळेच 2000 सालापासून मंडळाने गणपतीच्या अंगावर घालायला एकएक चांदीचा दागिना करायला सुरुवात केली. 2021 सालापर्यंत या मंडळातील गणपती बाप्पा पूर्णपणे चांदीच्या दागिन्यांनी मढवला गेला होता.

advertisement

2022 सालापासून सुवर्ण आभूषणे

दि गणेश फ्रेंड्स सर्कल या मंडळांने सुरुवाती पासूनच गणपतीला थोडी थोडी आभूषणे करायला सुरुवात केली होती. तर मागच्याच वर्षी म्हणजे 2022 सालापर्यंत गणेशमूर्तीला पूर्णपणे चांदीचेदागिने घातले जात होते. मात्र मागच्या वर्षापासून आता गणेशमूर्तीला चांदीऐवजी पूर्णपणे सुवर्ण अलंकारांनी मढवण्यास सुरुवात झालेली आहे.

कोल्हापूरकरांची 'लय भारी' आरास, बाप्पांसाठी उभारला जयप्रभा स्टुडिओ

advertisement

किती किंमतीचे आहेत दागिने?

सुवर्ण गणपती अशीच ओळख असलेल्या या गणेश मूर्तीवर पूर्णपणे सोन्याचे दागिने असून गणपतीच्या मागच्या बाजूला असलेली प्रभावळ ही चांदीची आहे. 70 ते 80 किलो चांदीची फक्त प्रभावळ असून त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त किमतीचे सुवर्ण अलंकार गणेशमूर्तीवर आहेत. मात्र भाविकांनी ज्या श्रद्धेने हे अलंकार चढवण्यासाठी सहकार्य केले आहे त्या श्रद्धेचा मान ठेवून या अलंकारांचे मूल्यमापन करण्यात आलेले नाही, असे मंडळाचे कार्यकर्ते आदित्य सरनोबत यांनी सांगितले आहे.

advertisement

दागिन्यांमध्ये कशा कशाचा समावेश?

गणेशमूर्तीच्या अंगावर असणारे सर्वच दागिने हे मुंबईच्या सराफाकडून बनवून घेण्यात आलेले आहेत. कोल्हापूर जिल्हा परिसरात पहील्यांदाच पूर्णपणे सोन्याच्या अलंकाराने मढवलेला सुवर्ण गणपती अशी या मंडळाची ख्याती होत आहे. या सुवर्ण अलंकारांमध्ये डोक्यापासून पायापर्यंत सर्व दागिन्यांचा समावेश आहे. डोक्याला किरीट, दोन्ही कान, सोंडेवरील झुल, दात, बाजूबंद, हातातील कंडे, दोन्ही हातातील शस्त्र, दाही बोटांतील अंगठ्या, गळ्यातील हार, दोन्ही हात, दोन्ही पाय, उंदिर असे हे सर्वकाही सोन्याचे बनवण्यात आल्याचे मंडळाचे कार्यकर्ते दुर्वांकुर खोत यांनी सांगितले आहे.

advertisement

केदारनाथ अन् वैष्णोदेवी, कोल्हापुरात होतंय देशातील 'शिव-शक्ती'चं दर्शन

अगदी सेम टू सेम छोटी गणेशमूर्ती

सर्वत्र सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तीसोबत छोटी गणेशमुर्ती पुजण्याची पद्धत आहे. दि गणेश फ्रेंड्स सर्कल या मंडळांने आपल्या गणपतीसोबत पुजली जाणारी छोटी गणेशमूर्ती देखील हुबेहूब मोठ्या मूर्तीप्रमाणेच केलेली आहे. ज्याप्रमाणे मोठ्या मूर्तीला दागिने आणि प्रभावळ आहे. अगदी तसेच दागिने आणि प्रभावळ छोट्या मूर्तीला देखील बनवण्यात आलेले आहेत.

मागच्या वर्षापासून वेगळ्या रंगाची पद्धत..

या मंडळांनी गणेश मूर्ती वरील दागिन्यांकडे तर लक्ष दिलेच आहे मात्र मूळ गणपतीची मूर्ती देखील कशी सुंदर बनवता येईल याकडेही पाहिले आहे. मागच्या वर्षीपासून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कुंभाराला सांगून मूर्तीवर विशेष रंग चढवला होता. अतिशय सुंदर दिसणाऱ्या या रंगात मूर्ती रंगवून देण्याची मागणी त्या कुंभारकडे इतर काही मंडळांनी केली होती. मात्र तशा पद्धतीचा विशेष रंग त्या कुंभाराने इतर कोणत्याच मूर्तीला दिलेला नाही, असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी गाव झालं एकत्र, 17 वर्षांपासून सुरूय मूर्तीदानाची चळवळ

दागिन्यांची सर्व जबाबदारी मंडळाच्या कार्यकर्त्यांवरच

पूर्णपणे सोन्याच्या दागिन्यांनी वाढवण्यात आलेली गणेश मूर्ती पाहिली की त्या दागिन्याच्या सुरक्षेविषयी नक्कीच प्रश्न उपस्थित होतो. मात्र मंडळात असणाऱ्या गणेश मूर्तीवरील सर्व दागिन्यांची जबाबदारी ही त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवरच असते. रोज साधारण शंभर पेक्षा जास्त कार्यकर्ते रात्रीच्या वेळी देखील मंडळात उपस्थित असतात, असेही आदित्य सरनोबत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सुवर्ण गणपती म्हणून या मंडळाची ख्याती कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या भागात देखील पसरत आहे. त्यामुळे दूरवरून लोक या सुवर्ण गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
चांदीची प्रभावळ अन् सोन्याचे अलंकार, कसा आहे कोल्हापुरातील सुवर्ण गणपती!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल