विशेष कोर्टाचे न्या. अभय लाहोटी यांनी सकाळी 11.10 वाजण्याच्या सुमारास निकाल वाचनास सुरुवात केली. न्या. लाहोटी यांनी निकालातील महत्त्वाचे एक एक मुद्यांचे वाचन सुरू केले. 1000 पेक्षा जास्त पानांचे निकालपत्र आहे. त्यातील काही महत्त्वाचे मु्द्दे अधोरेखित केले.
>> कोर्टाच्या निकालपत्रातील ठळक मुद्दे?
- Lcb नाशिक पोलीस,आझादनगर पोलीस मालेगाव, ATS मुंबई आणि NIA या चार यंत्रणांनी तपास केला.
advertisement
- कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा पुरावा रेकोर्डवर आणला नाही.
- पंचनामा व्यवस्थित झाला नाही.
- बाईकवर स्फोट झाला, हे सिद्ध झाले नाही
- आरोपींमध्ये बैठका झाल्याचा पुरावा नाही, आरोपींनी कट शिजला हे सिद्ध करण्यासाठी पुरावे नाहीत
- दुचाकी साध्वी प्रज्ञा यांची आहे, हे सिद्ध झाले नाही. बाईकवरील चेसीस नंबर हा साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या मोटरसायकलशी मिळताजुळता असू शकतो.
- मोबाइलमध्ये कोणतेही पुरावे नाहीत.
- आरोपींना युएपीए लावणे अयोग्य आहे
- अभिनव भारत या संस्थेच्या डोनेशन आणि आर्थिक व्यवहारात आरोपींचा संबंध आणि दहशतवादी कृत्यासाठी या पैशांचा वापर झाला, हा आरोप सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी
- तपासयंत्रणांनी लावलेले आरोप सिद्ध करण्यात अपयशी
- चार यंत्रणांनी केलेल्या तपासात समन्वय नाही
- आरोपींवर लावलेले गुन्हे चुकीचे
- या आरोपींच्या सहभागाची कहाणीत अनेक चुका
- तपास यंत्रणांनी अनेक तांत्रिक चुकाही केल्या
- पीडितांना 2 लाख,जखमींना 50 हजार देण्याचे आदेश
>> मालेगाव स्फोट प्रकरणातील महत्त्वाचे टप्पे
29 सप्टेंबर 2008 नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मालेगावातील भिक्कू चौकात झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 100 जण जखमी.
4-5 नोव्हेंबर 2008 – लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक
26-29 नोव्हेंबर 2008: 26/11 दहशतवादी हल्ले. मालेगाव प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी असलेले, महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना दहशतवादी हल्ल्यात वीरमरण.
20 जानेवारी 2009 : भारतीय दंड संहिता, मकोका आणि बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा आणि स्फोटकांच्या पदार्थ कायदा (substance act) कलमांखाली 4,528 पानांचे आरोपपत्र दाखल
31 जुलै 2009 – मकोका आरोप 19 जुलै 2010 रोजी रद्द केले. मुंबई उच्च न्यायालयाने मकोका आरोप पुन्हा लावले
डिसेंबर 2010 – या प्रकरणात एनआयए सहभागी
23 मे 2013 – एनआयएने मुंबईच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले
24 जुलै 2015 – तत्कालीन विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी या प्रकरणात मवाळ भूमिका घेण्यासाठी दबाव आणल्याचा दावा केला केला.
15 एप्रिल 2016 – एनआयएने म्हटले की ते बाजू घेत नाही किंवा विरोध करत नाही
डिसेंबर 2016 – निलंबित पोलिस अधिकारी महिबूब मुजावर यांनी दावा केला की दोन फरार आरोपी रामजी उर्फ रामचंद्र कलसांगरा आणि संदीप डांगे आहेत त्यांची हत्या केली. पोलिसांनी एनआयएने चौकशीचे आश्वासन दिले
25 एप्रिल 2017 – कर्नल पुरोहित यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला , साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामीन मंजूर
21 ऑगस्ट 2017 – सर्वोच्च न्यायालयाने कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर केला
23 ऑगस्ट 2017 – कर्नल पुरोहित तळोजा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले.
27 डिसेंबर 2017 – कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्धचा मकोका खटला रद्द
30 ऑक्टोबर 2018 – सात आरोपींविरुद्ध आरोप निश्चित
25 जुलै 2024 – एनआयए न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू
19 एप्रिल 2025 – खटल्याच्या न्यायालयाने निकाल जाहीर करण्यासाठी पूर्वी 8 मे तारीख निश्चित केली होती. मात्र आता 31 जुलै 2025 रोजी मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाचा निकाल जाहीर...