Malegaon Blast 2008 Case Verdict: No One Killed...17 वर्षानंतर साध्वी प्रज्ञासह मालेगाव स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Malegaon Blast Verdict : मालेगाव बॉम्बस्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 पेक्षा अधिक जखमी झाले होते.
मुंबई: मालेगावमध्ये बॉम्बस्फोटाचा निकाल आज एनआयए विशेष कोर्टाने सुनावला आहे. मागील 17 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकरणाचा आज निकाल लागला आहे. विशेष कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सगळ्या आरोपीना निर्दोष सोडले आहे. एनआयएने खटल्याच्या सुनावणी दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मालेगाव बॉम्बस्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 पेक्षा अधिक जखमी झाले होते.
या प्रकरणात भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चुतर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे आरोपी आहेत.
सरकारी वकिलांनी 323 साक्षीदारांची चौकशी केली, त्यापैकी 37 जण जबाबावरून फिरले. प्रकरणाचा तपास प्रथम एटीएस आणि नंतर एनआयएकडे सोपवण्यात आला होता. यूएपीएच्या कलम 16 (दहशतवादी कृत्ये) आणि 18 (दहशतवादी षडयंत्र रचणं), आयपीएसच्या कलम 120 बी (गुन्हेगारी षडयंत्र), 302 (हत्या), 307 (हत्येचा प्रयत्न), कलम 324 (दुखापत करणे) आणि 153 ए (दोन धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) या कलमांतर्गत आरोप निश्चिती झाली आहे.
advertisement
मालेगावचा बॉम्बस्फोट प्रकरण आहे काय?
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावातील भिकू चौकात एका दुचाकीत बॉम्बस्फोट झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तपासाची सूत्रे दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आली. एटीएसने आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि इतर आरोपींना अटक केली. एटीएसला या तपासा दरम्यान या स्फोटाशी संबिधत काही महत्त्वाचे पुरावे सापडले होते. यामध्ये काही व्हिडीओ क्लिपचाही समावेश असल्याची माहिती समोर आली होती.
advertisement
23 ऑक्टोबर 2008 रोजी बॉम्बस्फोटासाठी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वाहनाचा वापर झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. 4 नोव्हेंबर 2008 रोजी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करण्यात आली. मालेगाव बॉम्बस्फोटात RDX चा वापर झाल्याचा आरोप होता. त्याचा पुरवठा पुरोहित यांनी केला असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले होते. 2010 मध्ये या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला.
advertisement
>> मालेगाव स्फोट प्रकरणातील महत्त्वाचे टप्पे
29 सप्टेंबर 2008 नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मालेगावातील भिक्कू चौकात झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 100 जण जखमी.
4-5 नोव्हेंबर 2008 – लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक
26-29 नोव्हेंबर 2008: 26/11 दहशतवादी हल्ले. मालेगाव प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी असलेले, महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना दहशतवादी हल्ल्यात वीरमरण.
advertisement
20 जानेवारी 2009 : भारतीय दंड संहिता, मकोका आणि बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा आणि स्फोटकांच्या पदार्थ कायदा (substance act) कलमांखाली 4,528 पानांचे आरोपपत्र दाखल
31 जुलै 2009 – मकोका आरोप 19 जुलै 2010 रोजी रद्द केले. मुंबई उच्च न्यायालयाने मकोका आरोप पुन्हा लावले
डिसेंबर 2010 – या प्रकरणात एनआयए सहभागी
advertisement
23 मे 2013 – एनआयएने मुंबईच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले
24 जुलै 2015 – तत्कालीन विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी या प्रकरणात मवाळ भूमिका घेण्यासाठी दबाव आणल्याचा दावा केला केला.
15 एप्रिल 2016 – एनआयएने म्हटले की ते बाजू घेत नाही किंवा विरोध करत नाही
डिसेंबर 2016 – निलंबित पोलिस अधिकारी महिबूब मुजावर यांनी दावा केला की दोन फरार आरोपी रामजी उर्फ रामचंद्र कलसांगरा आणि संदीप डांगे आहेत त्यांची हत्या केली. पोलिसांनी एनआयएने चौकशीचे आश्वासन दिले
advertisement
25 एप्रिल 2017 – कर्नल पुरोहित यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला , साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामीन मंजूर
21 ऑगस्ट 2017 – सर्वोच्च न्यायालयाने कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर केला
23 ऑगस्ट 2017 – कर्नल पुरोहित तळोजा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले.
27 डिसेंबर 2017 – कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्धचा मकोका खटला रद्द
30 ऑक्टोबर 2018 – सात आरोपींविरुद्ध आरोप निश्चित
25 जुलै 2024 – एनआयए न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू
19 एप्रिल 2025 – खटल्याच्या न्यायालयाने निकाल जाहीर करण्यासाठी पूर्वी 8 मे तारीख निश्चित केली होती. मात्र आता 31 जुलै 2025 रोजी मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्ट निर्णय देणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2025 11:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Malegaon Blast 2008 Case Verdict: No One Killed...17 वर्षानंतर साध्वी प्रज्ञासह मालेगाव स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता