TRENDING:

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, MMRDA चा गेमचेंजर मेगा प्लॅन

Last Updated:

मुंबई आणि वाहतूक कोंडी हे समीकरण काही नवीन नाही. 15 मिनिटांचा प्रवास कधी तासभर तर कधी दीड तास चालतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई आणि वाहतूक कोंडी हे समीकरण काही नवीन नाही. सकाळच्या ऑफिस टाइममध्ये आणि सायंकाळी परतीच्या वेळी शहरातील प्रमुख हायवे पूर्णपणे जाम होतात. 15 मिनिटांचा प्रवास कधी तासभर तर कधी दीड तास चालतो. पण आता ही डोकेदुखी लवकरच संपणार आहे. कारण MMRDA ने या समस्येवर मोठा तोडगा काढला आहे. मुंबईत तब्बल 70 किलोमीटर लांबीचे भुयारी रस्त्यांचे जाळे उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
मुंबई वाहतूककोंडीला ‘भुयारी’ तोडगा! तब्बल ७० किमीचे भूमिगत रस्त्यांचे जाळे उभारण
मुंबई वाहतूककोंडीला ‘भुयारी’ तोडगा! तब्बल ७० किमीचे भूमिगत रस्त्यांचे जाळे उभारण
advertisement

या रस्त्यांमुळे दक्षिण मुंबई, बीकेसी, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बोरीवली यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना थेट जोडणी मिळणार आहे. वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही योजना शहराच्या भविष्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकते. MMRDA लवकरच यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करणार असून, सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Pune Traffic Alert : पुणे शहरात मोठा बदल! 'तो' महत्त्वाचा पूल 3 महिने राहणार बंद

advertisement

तीन टप्प्यांमध्ये उभारले जाणार भूमिगत मार्ग

1) पहिला टप्पा:

या टप्प्यात वांद्रे-वरळी सी-लिंकपासून बीकेसी (BKC) आणि पुढे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे बुलेट ट्रेन स्टेशन आणि विमानतळ यांच्यातील प्रवास अतिशय जलद आणि सुलभ होईल. हा टप्पा 16 किमी लांबीचा असून कोस्टल रोडशी थेट जोडला जाणार आहे.

advertisement

2) दुसरा टप्पा:

या टप्प्यात पश्चिम द्रुतगती महामार्ग (Western Express Highway) आणि पूर्व द्रुतगती महामार्ग (Eastern Express Highway) यांना जोडणारा मार्ग बांधला जाईल. हा मार्ग विमानतळाखालून जाणार असून, 10 किमी लांबीचा असेल. या टप्प्यामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांतील वाहतूक सुलभ होईल आणि विमानतळाशी थेट जोडणी मिळेल.

3) तिसरा टप्पा:

या टप्प्यात दक्षिण मुंबईपासून बोरीवलीपर्यंत विस्तृत भुयारी मार्ग उभारला जाईल. हा 44 किमी लांबीचा असेल आणि पुढे ठाणे-बोरीवली टनेलला जोडला जाणार आहे. या मार्गामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि किनारपट्टीवरील रस्त्यांवरील गर्दी घटेल.

advertisement

सध्या सुरू असलेले प्रमुख भुयारी प्रकल्प

ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग

हा मार्ग 11.85 किमी लांब असून, प्रकल्पाचा खर्च ₹18,838 कोटी आहे. या मार्गामुळे ठाणे आणि बोरीवलीदरम्यानचा प्रवास वेळ 1 तासावरून केवळ 15 मिनिटांवर येईल. सध्या भूमिगत ड्रिलिंग आणि भू-तांत्रिक सर्वेक्षणाची कामे सुरू आहेत.

ऑरेंज गेट – मरिन ड्राइव्ह भुयारी मार्ग

या मार्गाची लांबी 9.23 किमी असून, प्रकल्पाचा खर्च ₹9,158 कोटी आहे. दक्षिण मुंबईत बंदर भाग आणि मरिन ड्राइव्ह यांना थेट जोडणारा हा मार्ग, समुद्रकिनारी रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यास मदत करेल. प्राथमिक बांधकाम कामे सुरू आहेत.

advertisement

गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता (भुयारी मार्ग)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीला बनवा घरच्या घरी सुगंधित दिवे, अगदी झटपट होतील तयार,संपूर्ण Making Video
सर्व पहा

हा मार्ग 12.20 किमी लांब आहे. पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात जाण्यासाठी हा मार्ग पर्यायी जलद मार्ग ठरणार आहे. DPR टप्पा पूर्ण झाला असून पुढील निविदा प्रक्रिया सुरू आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, MMRDA चा गेमचेंजर मेगा प्लॅन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल