TRENDING:

पितृपक्षात का येतो नागपुरात गणपती? पाहा हाडपक्या गणपतीची अनोखी परंपरा

Last Updated:

पारंपरिक गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर नागपुरात गणेश उत्सव साजरा केला जातो. पाहा काय आहे अनोखी परंपरा?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर, 3 ऑक्टोबर: संपूर्ण भारतभर भाद्रपद महिन्यात पारंपरिक गणेशोत्सव साजरा होतो. नुकतेच या गणेशोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली आहे. मात्र, नागपुरातील गणेशोत्सव अद्याप संपलेला नाही. नागपूरकर भोसल्यांचा वतीने नागपुरातील महाल भागात असलेल्या मोठा राजवाडा येथे दरवर्षी पितृपक्षात हाडपक्या गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गेल्या 236 वर्षांपासून ही अनोखी परंपरा कायम आहे. पूर्व विदर्भातील लोक या पितृपक्षातील गणेश उत्सवात मोठ्या संख्येनं सहभागी होतात.
advertisement

मराठा साम्राज्याची सीमा अटक पासून कटकपर्यंत होती हे आपण नेहमीच ऐकलं अथवा वाचलं असेल. त्यातील कटक जिंकणारे पराक्रमी घराणं म्हणजे नागपूरचं नागपूरकर भोसले घराणं होय. याच घराण्यानं महाराष्ट्रातील वऱ्हाड पासून पश्चिम बंगाल, ओडिसा, इत्यादींवर आक्रमण करून अन्यायाविरुद्ध समशेर उगारून मराठा साम्राज्याला बळ प्राप्त करून दिलं. तसेच 'सेनासाहेभ सुभा' हे मानाचे पद भूषविलं. त्याच नागपूरकर भोसल्यांचा नागपुरातील महाल भागात मोठा राजवाडा असून या ठिकाणी दरवर्षी पितृपक्षात हाडपक्या गणेशोत्सव साजरा होतो.

advertisement

काय सांगता! नागपूरच्या शिक्षिका 11 भाषांमध्ये गातात उलटं गाणं, Video

विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवात भर

गेल्या 236 वर्षांपासून अविरतपणे हा गणेश उत्सव साजरा होतो. नागपूरकर भोसले घराणं मोठ्या उत्साहात हाडपक्या गणेशोत्सव साजरा करतं. हा गणेश उत्सव विदर्भाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवामध्ये भर घालणारा आहे. या गणपती बद्दल लोकांमध्ये अपार श्रद्धा असून नवसाला पावणारा गणपती म्हणून स्थानिक लोकांमध्ये लोकभावना आहे. विदर्भातील अनेक उत्सवांप्रमाणेच हाडपक्या गणेश उत्सव पूर्व विदर्भात, भंडारा, गोंदिया, वर्धा आदी ठिकाणच्या लोकांनी सार्वजनिक स्वरूपात हा सण देखील आपलासा केला आहे.

advertisement

हाडपक्या गणेशोत्सवाचा रंजक इतिहास

या उत्सवाच्या नावामागे देखील रंजक इतिहास आहे. भाद्रपद महिन्यात पारंपरिक गणेशोत्सव साजरा झाल्यावर पितृपक्ष सुरू होतो. पितृपक्षाला विदर्भातील बोली भाषेत हाडोक, हाडपोक किंवा हडपक असे म्हणतात. या काळात या गणपतीची प्रतिष्ठापना केली जात असल्याने या गणपतीला भोसले काळापासून ‘हाडपक्या गणपती’ असे संबोधले जाते.

गांधीजींनी बांधलेला ऐतिहासिक ठेवा संकटात, नागपूरकरांची मागणी कधी मान्य होणार?

advertisement

'मस्कऱ्या गणपती' या नावानेही ओळख

मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यापासून दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात पूर्वापार अनेक लोककला सादर करण्यात येतात. प्रामुख्याने लावणी, नकला, खडी गंमत इत्यादी अनेक थट्टा- मस्करीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असत. या कार्यक्रमांना नागपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत. या मागील मुख्य धारणा अशी की, या लोककलेला राजाश्रय देऊन ही लोककला जपली जावी आणि समाजात एकता प्रस्थापित व्हावी. कालांतराने या थट्टा- मस्करीच्या कार्यक्रमाहून या गणेशोत्सवाला स्थानिक बोलीभाषेतील 'मस्कऱ्या गणपती' म्हणून देखील नाव प्रचलित झाले, अशी माहिती रघुजी राजे भोसले यांनी दिली.

advertisement

1787 मध्ये गणपतीची स्थापना

नागपूरकर भोसले घराण्यातील लढवय्ये सरदार श्रीमंत समशेर बहादूर राजे खंडोजी महाराज भोसले उपाख्य चिमणाबापू हे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बंगालच्या स्वारीवर गेले होते. तेथे विजय प्राप्त करून परत येत असताना कुळाचाराच्या घरगुती गणपतीचे विसर्जन झाले होते. त्यामुळे बंगालवरील विजयोत्सव साजरा करण्यासाठी पितृपक्षात इ.स. 1787 मध्ये चिमणाबापू यांनी हाडपक्या गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून या उत्सवाची परंपरा सुरू झाली. नागपुरातील भोसले घराण्यात दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो.

फेकून दिलेल्या कागदाचा असाही वापर; नागपूरच्या आजोबांनी बनवल्या भन्नाट कलाकृती

मूर्तीची उंची केली कमी

भोसले राजवाड्यातील हाडपक्या गणपतीची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचे वेगळेपण म्हणजे भोसले घराण्यात चिमणाबापूंनी 12 हातांची, 21 फुटाची मूर्ती स्थापन केली होती. अनेक वर्षे याच प्रकारच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात होती. परंतु 2005 पासून मूर्तीची उंची कमी करण्यात आली. आता साडेतीन फुटांची मूर्ती पूजेसाठी ठेवण्यात येते. संकष्टी चतुर्थीला त्याची प्रतिष्ठापना केली जाते आणि 10 दिवसांनी या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. या दहा दिवसांच्या दरम्यान खडीगंमत, लावण्या, भजन, पोवाडे, सुगम संगीत, हास्यकल्लोळ, जागरण, आनंद मेळावा यासारखे विविध लोककला प्रकार सादर केले जातात. दरवर्षी भोसले वाड्यात हा उत्सव अविरतपणे साजरा केला जातो, अशी माहिती रघुजी राजे भोसले यांनी दिली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
पितृपक्षात का येतो नागपुरात गणपती? पाहा हाडपक्या गणपतीची अनोखी परंपरा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल