TRENDING:

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ,समोर आलं सत्य

Last Updated:

रात्री घडलेली घटना चुकीच्या पद्धतीने दाखवल्या जात आहे. आम्ही रोडचे काम करत असताना संपूर्ण सेफ्टी वापरूनच काम केले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई : महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्ग अपघातांमुळे हा कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. दरम्यान अशीच एक अपघाताची धक्कादायक बातमी समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. यात समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा नागपूरकडून मुंबईकडे निघालेल्या अनेक गाड्या अचानक पंक्चर झाल्याची घटना घडली आहे.

समृद्धी महामार्गावरील या घटनेचा त्याचा व्हिडीओ संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण आले, मात्र न्यूज एटीन लोकमतने नक्की घटना काय घडली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या टीमला मेगा इंजिनिअरिंग कंपनीच्या सुपरवायझरने माहिती दिली. रात्री घडलेली घटना चुकीच्या पद्धतीने दाखवल्या जात आहे. आम्ही रोडचे काम करत असताना संपूर्ण सेफ्टी वापरूनच काम केले जाते.

advertisement

मागच्या दहा दिवसापासून आम्ही अशा प्रकारचं काम संपूर्ण महामार्गावर करत आहोत. ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी रात्री बॅरिकेट्स लावण्यात आले होते, मात्र एका अज्ञात वाहनाने बॅरिकेट्स उडवले आणि ते बाजूला जाऊन पडले, त्याच वेळी भरधाव वेगाने आलेली गाडी लावलेल्या नोझलवर जाऊन तयार फुटले, तो वाहनचालक मद्यप्राशन केलेला होता त्याने पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. शिवीगाळ केली आणि बॅरिकेट्स नसल्याचे व्हिडिओ काढले, त्यातून ही संपूर्ण घटना समोर आली.

advertisement

मात्र या अगोदर देखील आम्ही काम केलेले आहे मागील तीन वर्षापासून रोडवर आम्ही हे काम करतो आणि मोजल लावण्याचे काम देखील मागील दहा दिवसापासून चालू आहे त्यावेळी ही घटना घडली नाही. दारू पिऊन या व्यक्तीने रात्री गोंधळ घातल्याचे मेगा इंजीनियरिंग या कंपनीमध्ये काम करणाऱ्या सुपरवायझरने सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ,समोर आलं सत्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल