पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अंबिका जिल्ला यांची मुलगी सौंदर्या व्यंकटेश येमूल ही भद्रावती पेठेत राहण्यास असून त्यांचा दत्त चौक येथे भजी व समोसे विक्री करण्याचा व्यवसाय आहे. मृत अंबिका ही मुलगी सौंदर्या यांच्याकडे समोसे बनवण्यासाठी जात असते. दिवसभर समोसे बनवण्याचं काम करून माधवनगर येथे राहत असलेल्या घरी परत जात असत.
advertisement
चोरीला गेलेली दुचाकी अचानक दिसली, चौकशी केली तर..., छ. संभाजीनगरात भीतीचे वातावरण
गुरुवारी गव्हर्मेंट पॉलिटेक्निकल कॉलेज समोरील रस्ता ओलांडत असताना अशोक चौकाकडून येणाऱ्या MH-13-DY- 5467 या भरधाव कारने अंबिका जिल्ला यांना जोरदार धडक दिली. या धडकेत अंबिका यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना जखमी व बेशुद्ध अवस्थेत कारचालक व नागरिकांच्या मदतीने सोलापुरातील मार्कंडेय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच रुग्णालयातील डॉक्टर आर.ए. येलदी यांनी मृत घोषित केले.
कुटुंबाचा आधार गेला
दोन वर्षांपूर्वीच मृत अंबिका यांच्या पतीचा हात मशीनमध्ये जाऊन निकामी झाला होता. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह अंबिका यांच्यावरच अवलंबून होता. त्यांना चार मुली असून तीन मुलींचं लग्न झालं आहे. तर एक मुलगी विवाह योग्य आहे. अचानक घडलेल्या या अपघातामुळे जिल्ला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर कारचालक सिद्धाराम नागनाथ चाबुकस्वार राहणार अंत्रोळीकर नगर सोलापूर याच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार राठोड हे करत आहेत.






