आता कोलशेत-ढोकाळी परिसरातील ‘नमो सेंट्रल पार्क’ हे उद्यानही शूटिंगसाठीचं नवं आकर्षण केंद्र ठरणार आहे. या ठिकाणी लवकरच मोठ्या प्रमाणावर चित्रपट, जाहिराती, वेब सिरीज आणि प्री-वेडिंग शूट्स होणार आहेत. ‘मिर्झापूर’ वेब सिरीजचा तिसरा सिझन, तसेच रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांच्या आगामी चित्रपटांतील काही दृश्यांचं शूटिंगही या पार्कमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ठाणे आता खरंच बॉलिवूडच्या कॅमेऱ्याचं नवं लक्ष्य ठरत आहे.
advertisement
Mumbai One अॅपमुळे प्रवास झाला सोपा! जाणून घ्या हे अॅप कसे वापरायचे आणि काय सुविधा मिळतात
या उद्यानात शूटिंगसाठी ठाणे महापालिकेने निश्चित केलेले दर पुढीलप्रमाणे आहेत —
डीएसएलआर फोटोग्राफी – 150 प्रतिदिन
प्री-वेडिंग शूट – ₹10,000
चित्रपट / डॉक्युमेंट्री – ₹20,000
वेब सिरीज / कमर्शिअल शूट – ₹2,00,000
जाहिरात / टीव्ही फिल्म – ₹1,00,000
नागरिकांसाठी वेळ आणि शुल्क
नमो द ग्रँड सेंट्रल पार्क हे उद्यान सकाळी 6 ते 11 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या वेळात नागरिकांसाठी खुले असते. या ठिकाणी 12 वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश दिला जातो. प्रौढांना 20 रुपये, शनिवार आणि रविवारी 30 रुपये, तर सुट्टीच्या दिवशी देखील 30 रुपये प्रतिदिन शुल्क आकारले जाते. ज्येष्ठ नागरिकांना 10 रुपये प्रतिदिन, तर मासिक पास सकाळसाठी 250 रुपये आणि सकाळ आणि सायंकाळसाठी 500 रुपये आहे. तर चारचाकी वाहनाला 4 तासांसाठी 40 रुपये, सायकलला 20 रुपये आणि दुचाकीला 4 तासांसाठी 20 रुपये शुल्क आकारले जाते.
कसे आहे उद्यान?
‘नमो सेंट्रल पार्क’ हे 20.5 एकरांवर पसरलेले उद्यान असून, येथे काश्मीर, चीन, मोरोक्को आणि जपान थीमवरील सुंदर बागा, तसेच रेस्टॉरंट, कॅफेटेरिया, क्रीडांगण अशा सुविधा आहेत. गेल्यावर्षी 8 फेब्रुवारी 2024 रोजी या उद्यानाचे लोकार्पण झाले. 3500 हून अधिक झाडांच्या हरिताईने नटलेलं हे उद्यान नागरिकांसाठी आणि चित्रनिर्मात्यांसाठी एक आकर्षक ठिकाण ठरणार आहे.