TRENDING:

उपवासाच्या दिवशी अतिप्रमाणात खाऊ नका 'हा' पदार्थ, अन्यथा होईल मोठा त्रास

Last Updated:

उद्या आषाढी एकादशीचा उपवास आहे. त्यामुळे या दिवशी म्हणजे उपवासाच्या दिवशी नेमकी काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी
advertisement

ठाणे : आषाढी एकादशीनिमित्त अनेक जण उपवास करतात. उपवास म्हणजे दररोज जितकं आपण जेवण करतो, ते न खाणं आणि उपवासाचे पदार्थही कमी प्रमाणात खाणं. मात्र, अनेक जण उपवासाच्या दिवशी साबुदाण्याचं मोठ्या प्रमाणात सेवन करतात. साबुदाण्यात कॅलरी जास्त असल्याने ते पोटाला पचायला जड जाते. त्यामुळे अति प्रमाणात साबुदाणा खाऊ नये, हे उपवास करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. याविषयी डॉ नितीन पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली.

advertisement

लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, उपवासाच्या दिवशी अनेक जण फळ किंवा पाणी पिण्याऐवजी खाण्याकडे जास्त लक्ष देतात. साबुदाणा हा उपवासाच्या दिवशी खाल्ला जाणारा महत्त्वाचा पदार्थ आहे. हा पदार्थ पचवायला जड असतो. त्यामुळे हा जर खाल्ल्यानंतर पचला नाही तर पोटाचे आजार होण्याची शक्यता आहे.

या तारखेपासून सुरू होतोय चातुर्मास, या काळात नेमकं काय करावं, कोणत्या गोष्टी करू नयेत, संपूर्ण माहिती

advertisement

यामध्ये उलटी होणं, अ‍ॅसिडिटी होणं, पोट साफ न होणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अनेकांना तर रात्रीपर्यंत डोकेदुखीची समस्या सुद्धा उद्भवते. उपवासाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात साबुदाण्याचे आणि तेलकट पदार्थ खाल्ले जातात, यामुळे अशा समस्या होतात' असे डॉ. नितीन पाटील यांनी सांगितले.

भगर खाण्याचे आहेत भरपूर फायदे, अनेकांना माहिती नसेल, तज्ज्ञांनी काय सांगितलं?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सावधान! थंडीच्या दिवसांत ‘हार्ट अटॅक’चा धोका, कारण काय? अशी घ्या काळजी
सर्व पहा

त्यामुळे जर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मधुमेह असणाऱ्यांनी विशेष या दिवसात काळजी घ्या. कॅलरीत जास्त असल्यामुळे साबुदाणा पचायला जड जातो. त्याऐवजी फळ किंवा इलेक्ट्रॉन पावडर घ्या. यामुळे तुम्हाला बरे वाटेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
उपवासाच्या दिवशी अतिप्रमाणात खाऊ नका 'हा' पदार्थ, अन्यथा होईल मोठा त्रास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल