वर्धा : बॉलिवूड सिनेअभिनेते आमिर खान यांनी वर्धा येथील महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला रविवारी भेट दिली. सुरुवातीला शहरातील पाणी फाउंडेशनचा कार्यक्रमला त्यांनी हजेरी लावली. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते या ठिकाणी आले होते.
यावेळी आश्रमाकडून आमिर खान यांना कातलेल्या सुताची माळ आणि चरखा भेट स्वरुपात देण्यात आला. यावेळी आमिर खान यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
advertisement
काय म्हणाले आमिर खान -
'मी पहिल्यांदाच महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात आलो आहे. इथे आल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. इथे आल्यानंतर मला एक वेगळी प्रकारची ऊर्जा जाणवली. मी गांधीजींचा अनुयायी असून गांधीजींच्या विचारांचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव राहिला आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की, ज्या ठिकाणी महात्मा गांधीजींनी आपल्या जीवनातील मोठा काळ व्यतीत केला त्या ठिकाणी येण्याची मला संधी मिळाली. त्यांनी वापरलेल्या वस्तू पाहून तेव्हाच्या आणि आताच्या काळात आलेला फरक, मी शब्दात व्यक्त करू शकत नाही', या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिक्षण फक्त 7 वी पास, परिस्थितीवर केली मात, उभारला मोठा उद्योग, आज हजारो कर्मचारी कामाला!
दरम्यान, यावेळी आमिर खान यांच्यासोबत फोटो सेल्फी काढण्यासाठी तसेच त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चाहत्यांना बाजूला सारण्यासाठी सुरक्षा रक्षकांना मोठी कसरत करावी लागली.
कोल्हापूरच्या कपलची कॅफे व्हॅन सुसाट! 16 प्रकारच्या चीज केकसह युनिक डिशची पर्वणी, हे आहे लोकेशन
वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींनी आपल्या जीवनातील मोठा काळ घालवला आहे. यामुळे या आश्रमाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. देश-विदेशातील पाहुणेही भारतात आल्यानंतर सेवाग्राम आश्रमाला भेट देण्यास प्राधान्य देतात. त्यातच काल आमिर खान यांनीही याठिकाणी भेट दिली. त्यांची ही याठिकाणी पहिलीच भेट असल्याचे त्यांनी सांगितले.