भंडारा : भंडारा जिल्ह्यात मोठे उद्योग उपलब्ध नसल्यामुळे महिला पुरुषांना रोजगाराठी वणवण भटकावे लागतेय. मात्र लाल मिरचीच्या सातरेने भंडारा जिल्ह्यातील हजारो महिला-पुरुषांना मोठ्या प्रमाणात रोजगार गावातच उपलब्ध झालेला आहे. परीणामी रोजगारासाठी होणारी भटकंती थांबली आहे.
भंडारा जिल्ह्यात उद्योगाचा वाणवा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिला आणि पुरूषांना रोजगारासाठी नागपूर, पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यात स्थलांतरीत व्हावे लागते. परंतु, गेल्या तीन- चार वर्षांपासून लाल मिरची साफ करण्याचे सातरे जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू झाले आहेत. त्यामुळे मजूरांची रोजगारासाठी होणारी वणवण थांबून गावातच रोजगार उपलब्ध होऊ लागलेले पहायला मिळत आहेत.
advertisement
वडिलांची कल्पना, मुलाची कमाल! सर्वजण करतायेत कौतुक, शेतकरी कुटुंबाची गोष्ट नक्की वाचा..
नाईलाजाने मजूर करताहेत काम
जिथे मजूर उपलब्ध आहेत त्याठिकाणी हे सातरे मिरची ठेकेदारांमार्फत चालविण्यात येत आहेत. हे काम मानवी शरीरास नुकसानदायक असले तरी जिल्ह्यात रोजगाराचे दुसरे साधन उपलब्ध नसल्याने मजूरांना हे काम करावे लागत आहे. भंडाऱ्यातील किटाडी येथील साताऱ्यावर 200 ते 300 मजूर कार्यरत असून त्यांना साफ करण्यासाठी मिरची आंध्रप्रदेशातील ठेकेदाराकडून उपलब्ध होते.
शेतकऱ्याचा नादच खुळा! चक्क बेडवर केली ज्वारी लागवड, पीक करणार मालामाल, Video
या मिरचीच्या मुक्या काढल्या जातात. त्या मोबदल्यात मजूरांना पोत्यामागे ठराविक मजूरी दिली जाते. ही मजुरी मात्र अत्यल्प असते तरीसुद्धा काही नसण्यापेक्षा काही का होईना मजुरी तरी मिळावी म्हणून हे काम करत असल्याचे येथील मजूर सांगतात. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळण्याच्या उद्देशाने आणखी उद्योग निर्मिती व्हावी, नव्या कंपन्या कारखाने सुरू व्हावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मजूर करताहेत मागणी
आमच्या गावात काहीच रोजगारासाठी कामे उपलब्ध नाही. कारखाने, कंपन्या किंवा शेतीचे देखील काम मिळत नाही. तसेच सिंचनाचे देखील कामे नसल्याने हाताला रोजगार मिळावा म्हणून हे काम करावं लागतंय मात्र आम्हाला रोजगार मिळवा आणि कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जाणे थांबावे यासाठी याठिकाणी शासनाने लक्ष देऊन उद्योग सुरू करून घ्यावे आशी मागणी येथील मजूर वर्ग करत आहेत.