वर्धा : प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी छंद असतो. छंदामुळे आपल्या मनावरील ताणदेखील दूर होतो. वर्ध्यातील तरुण मूर्तिकार योगेश सुधाकर भामकर यांना लहानपणापासून मूर्तिकलेची प्रचंड आवड आहे. त्यांचा मूर्ती बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यामुळे काहीतरी नवीन आयडिया किंवा मूर्तिकलेत काहीतरी नवीन घडवावे यासाठी त्यांनी हातातल्या मोबाईलचा वापर केला. यूट्यूबच्या मदतीने त्यांनी पारंपारिक मूर्तिकलेला फाटा देत म्युरल फायबर आर्टबद्दल माहिती घेतली आणि नव्या पद्धतीने मूर्ती घडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या साकार झालेल्या मूर्ती वर्धेकरांना आकर्षित करतायत.
advertisement
म्युरल फायबर आर्टच्या मूर्ती बनवणारे योगेश हे वर्ध्यातील पहिलेच कलाकार आहेत. योगेश यांनी वेगवेगळ्या मूर्ती बनविल्या आहेत. ज्यांना खरेदी करणे मूर्तीप्रेमी पसंत करतायत. विक्रीतून चांगली मिळकत देखील मिळत असून योगेश यांच्या कलेचं कौतुक केलं जातंय.
नादच करायचा नाय! बँकेची नोकरी सोडून सुरू केली शेती, फक्त 3-4 तास काम, अन् गडी महिन्याला छापतोय नोटा
म्युरल फायबरमध्ये बनवल्या आकर्षक मूर्ती
आजोबा आणि वडिलांकडून मूर्तीकला लहानपणापासूनच योगेश यांनी आत्मसात केली. ज्यात गणपती, दुर्गादेवी, महालक्ष्मी, अशाप्रकारे सीजनेबल मूर्ती बनवल्या जायच्या परंतु त्याला आधुनिकतेची जोड देतदीड वर्षांपूर्वी म्युरल फायबर आर्ट बनवण्याचं कार्य सुरू केलं. ज्यात शाडू मातीने साचा बनवून फायबर कोटिंग देऊन आकर्षक मूर्ती साकार होऊ लागल्या. छोट्या मूर्ती बनविल्यानंतर त्यांनी मोठ्या मूर्तीचं काम हातात घेतलं. सध्या राधा-कृष्णची मूर्ती ते तयार करत आहेत जी सात फुटांची आहे. याआधी त्यांनी पुंडलिक महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राधा-कृष्ण या मूर्ती बनविल्या आहेत.
सोळाव्या वर्षी बनवले पारायणाचे 21 अध्याय
गेल्या पंचवीस वर्षांपासून योगेश मूर्ती कलेशी जुडलेले आहेत,यादरम्यान योगेश यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पोर्ट्रेटमध्ये गजानन महाराज परायनाचे 21 अध्याय बनवले. ते इतके आकर्षक होते की वर्ध्यातील गजानन महाराज मंदिरात हे पोर्ट्रेट लावलेले आहेत. केवळ पारंपरिक मूर्ती कलेची माहिती असून कोणतेही प्रशिक्षण न घेता साकार झालेली अनोखी मूर्तिकला योगेश यांची नवी ओळख बनली आहे.





