advertisement

नादच करायचा नाय! बँकेची नोकरी सोडून सुरू केली शेती, फक्त 3-4 तास काम, अन् गडी महिन्याला छापतोय नोटा

Last Updated:

देवाशिष हा असाच एक तरुण आहे. देवाशिष याने आपली बँकेची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. आता हा तरुण महिन्याला चांगली कमाई करत आहे.

देवाशिष
देवाशिष
आकाश कुमार, प्रतिनिधी
जमशेदपुर : काही जण असे असतात जे नोकरी सोडून शेती करणे पसंत करतात आणि तिथे यशस्वी होऊन दाखवतात. आज अशाच एका व्यक्तीची आपण अत्यंत प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊयात. मशरुमची मागणी सर्वत्र वाढत आहे. याची मागणी पाहता, उत्पादनही मोठ्या प्रमाणात केले जात आहे. अनेक तरुण आता या मशरुमची शेतीमध्ये रस घेताना दिसत आहेत.
advertisement
ऑफिसची धावपळ, दगदगीचे आयुष्य, ताणतणाव आणि पगाराचे टेन्शन यामुळे अनेक तरुण नोकरी ऐवजी मशरुमच्या शेतीमध्ये उतरताना दिसत आहे. कमी खर्चात आणि काही तासांच्या मेहनतीने मशरूमच्या लागवडीतून हजारोंची कमाई होत आहे. आठ किंवा 10 तासांच्या कामाच्या तुलनेत ही शेती खूप कमी वेळात चांगले उत्पन्न देत आहे.
देवाशिष हा असाच एक तरुण आहे. देवाशिष हा झारखंडमधील जमशेदपूर येथील रहिवासी आहे. त्याने आपली बँकेची नोकरी सोडून मशरूमची शेती सुरू केली आहे. लोकल18 च्या टीमशी बोलताना त्याने सांगितले की, तो बँकेची नोकरी करायचा. मात्र, नोकरीच्या कारणामुळे त्याचे संपूर्ण शेड्युल हे व्यस्त असायचे. त्याला काहीतरी आपले स्वत:चे काम सुरू करायचे होते. त्यामुळे त्याने नोकरी सोडत मशरुमची शेती सुरू केली. दिवसाला तो फक्त तीन ते चार तास काम करतो आणि फक्त इतक्या कामातून तो महिन्याला 25 ते 30 हजार रुपये अगदी सहज कमावत आहे.
advertisement
अरे ही कसली आवड, फूलांनी नव्हे तर काट्यांनी सजवलं घर, खर्च केले तब्बल 15 लाख रुपये, variety ही हजार प्रकारची photos
त्याने सांगितले की, सफेद मशरुम आणि ऑयस्टर मशरुम असे मशरुमचे दोन प्रकार असतात. दोन्ही प्रकारची शेती भारतात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. देवाशिष हा ऑयस्टर मशरुमची शेती करतो. त्याने आपल्या घरातच त्यासाठी 500 वर्गफुटाची जागा तयार केली आहे. प्लास्टिकच्या बॅगेत याची शेती केली जाते. सकाळी आणि संध्याकाळी पाणी देणे महत्वाचे आहे. एकूण 25 दिवसात मशरुम तयार होत असल्याचे तो म्हणाला.
advertisement
बॅग दोन महिन्यांसाठी परफेक्ट असते. या दोन महिन्यात जवळपास 4 ते 6 वेळा मशरुम निघते. एका वेळी एक किलो मशरुम निघते. ते तुम्ही बाजारात विकू शकतात. याठिकाणी बाजारात या मशरूमला प्रतिकिलो 180 ते 200 रुपये भाव मिळत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/मनी/कृषी/
नादच करायचा नाय! बँकेची नोकरी सोडून सुरू केली शेती, फक्त 3-4 तास काम, अन् गडी महिन्याला छापतोय नोटा
Next Article
advertisement
Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले? 'सिक्रेट लिस्ट'ने वाढवलं टेन्शन
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement