प्रतिनिधी: आईपासून दुरावलेल्या चिमुकल्या राजूची ही गोष्ट आहे. हा राजू म्हणजे वर्ध्याच्या करुणाश्रमात नुकतंच दाखल झालेलं अलबिनो माकडाचं पिल्लू आहे. आर्वी येथे एका घरावर हे पिल्लू निपचित अवस्थेत पडलेलं आढळलं. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच त्याला पीपल्स फॉर अनिमल्सच्या करुणाश्रम येथे आणलं. डॉक्टरांनी तपासलं तेव्हा त्याला मेलोनिझम हा अतिशय दुर्मिळ असा आजार असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्याच्यावर करूणाश्रमात उपचार करून आश्रय देत काळजीही घेतली जात आहे. वर्ध्यात प्रथमच अशाप्रकाचं अलबिनो माकड आढळलं असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे येथील प्राणीप्रेमींनी लाडाने त्याचं नामकरण 'राजू' असं केलंय.
advertisement
होळीच्या हानिकारक रंगांपासून त्वचेची काळजी कशी घ्यावी? तज्ज्ञांनी सांगितला रामबाण उपाय
प्राणीप्रेमी प्रेमाने भरवतात जेवण
"सध्या राजूची प्रकृती बरी असली तरी करूणाश्रमातील प्राणी प्रेमींच्या सहवासात तो लवकरच अगदी ठणठणीत होणार आहे. राजू सध्या खूप लहान आहे. त्यामुळे त्याला रोज दूध प्यायला दिलं जातंय. अतिशय प्रेमाने दिवसातून सहा वेळा करुणाश्रमातील प्राणीप्रेमी त्याला त्याचं जेवण भरवतात. इतर प्राण्यांपासून राजू सुरक्षित रहावा म्हणून एका सुरक्षा पिंजऱ्यात राजूला ठेवण्यात आलंय," असं प्राणीमित्र ऋषिकेश गोडसे यांनी सांगितलं.
रंगांविना खेळली जाते होळी, महाराष्ट्रातलं असंही एक गाव, नेमकी ही परंपरा काय?
चिमुकल्या राजूचा कर्मचाऱ्यांना लळा
सध्या डॉक्टर संदीप जोगे यांच्या मार्गदर्शनात राजूवर उपचार केले जात आहेत. करुणाश्रमातील कर्मचाऱ्यांना देखील चिमुकल्या राजूचा लळा लागला आहे. राजूला जेव्हा पिंजऱ्याच्या बाहेर काढलं जातं तेव्हा तो अतिशय शांत असतो. करूणाश्रमातील प्राणीमित्रांशी आता राजूची मैत्री झालीय. मात्र करूणाश्रमात तो किती दिवस राहील हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरविले जाणार आहे. पिपल फॉर एनिमल्सचे अध्यक्ष आशिष गोस्वामी आणि येथीलच प्राणी प्रेमी ऋषिकेश गोडसे यांच्यासह इतर कर्मचारी मिळून राजूची काळजी घेत आहेत.





