विनयने सगळं ऐकलं होतं.. तेवढ्यात त्याच्या हृदयाते ठोके वाढले... शेवटचा प्रवास? म्हणजे उद्यापासून ती नाही? त्या क्षणी लोखंडी रॉड, गर्दीतला आवाज, दारात उभी माणसं सगळं त्याच्या समोरुन पुसट झालं. त्याच्या मनात अतिशय स्पष्ट एकच आवाज आला. आज नाही बोललो, तर पुन्हा कधी बोलणार नाहीस.