छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात सध्या शेतीची कामं जोमात सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. कापूस हाताळायला जेवढं नाजूक असतं. तेवढीच नाजूकपणे वाढीच्या अवस्थेत त्याची काळजी घ्यावी लागते. महत्त्वाचं म्हणजे कापसाला रोगराई पटकन लागते. अशावेळी कोणत्या उपाययोजना कराव्या, कोणत्या औषधांची फवारणी करावी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे कृषी अधिकारी टी एस मोटे यांनी.
advertisement
कापसाचं पीक जरा मोठं झालं की, त्याला रोगराई लागायला सुरूवात होते, त्यावर रसशोषक आळ्या वाढतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं, उत्पादन कमी मिळू शकतं. म्हणूनच कापसाची विशेष काळजी घ्यावी. रसशोषक अळ्या पिकांची पानंसुद्धा खातात. कापसावर मावा, तुडतुडे, अळी, बोंड अळी, थ्रिप्स या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
हेही वाचा : टोमॅटोची लागवड 'अशी' करा, तरच मिळू शकतं बक्कळ उत्पन्न
यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे लिंबोळीचा अर्क फवारणं. यामुळे रोगराई कमी व्हायला मदत मिळते. शिवाय हा सर्वात सोपा उपाय आहे. तसंच बाजारात अनेक कीटकनाशकंही उपलब्ध आहेत.
ही कीटकनाशकं फवारल्यानंतर जरा विषारी होतात आणि पिकांना लागलेला रोग नष्ट व्हायला मदत मिळते. परिणामी पिकांचं रक्षण होतं. अशापद्धतीनं कापसाची काळजी घेतली, तर शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन आणि त्यातून उत्तम उत्पन्न मिळू शकतं, असं कृषी अधिकारी टी एस मोटे यांनी सांगितलं.