या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर फुल मार्केट सुद्धा विठ्ठल भक्तीच्या रंगात रंगलेलं दिसत आहे. एकादशीच्या आदल्या दिवसांपासूनच येथे खरेदीसाठी गर्दी उसळते. यावर्षीही मार्केटमध्ये झेंडू, शेवंती, चाफा, तुळशी यांसारख्या पूजेच्या फुलांना आणि पत्रांना मोठी मागणी आहे.
Fasting Recipe: आषाढी एकादशीला बनवा रताळ्याचे गुलाबजाम, रेसिपी अशी की बोटं चाखत बसाल!
यंदाचे फुलांचे दर (होलसेल):
advertisement
लाल व पिवळा झेंडू: 80 रुपये प्रति किलो
शेवंती: 80 रुपये प्रति किलो
चाफा (फ्रेंजिसिपानी): 140 रुपये प्रति शेकडा (100फुलं)
तुळशीपत्र: 20 प्रति जुडी
विठ्ठलाची पूजा करताना तुळशीपत्र अर्पण करणं अत्यंत पवित्र मानलं जातं. त्यामुळे तुळशीची जुडी खरेदी करण्यासाठी ग्राहक विशेष गर्दी करत आहेत. काही व्यापाऱ्यांच्या मते, मागणीमुळे एकादशीच्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी किंमतीत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.
दादर मार्केटमध्ये सकाळपासूनच भाविक आणि विक्रेत्यांची वर्दळ दिसून येते. अनेक जण पूजेसाठी लागणारी फुलं मोठ्या प्रमाणावर विकत घेत आहेत. काहीजण घरच्या पूजेसाठी, तर काहीजण मंदिरासाठी अथवा सामाजिक पूजांसाठी फुलं खरेदी करत आहेत.
एकादशीचा सण आणि भक्तीचा उत्साह
आषाढी एकादशी ही वारकऱ्यांचा आणि विठ्ठलभक्तांचा महत्त्वाचा सण. घराघरात विठ्ठल-रखुमाईची पूजा केली जाते. सकाळी उपवास, अभिषेक, भजन, आणि नामस्मरण यांचा कार्यक्रम पार पडतो. त्यामुळे पूजेसाठी लागणारी फुलं आणि पत्रं यांची महत्त्वाची भूमिका असते. फुलांच्या या रंगीबेरंगी बाजारातही एक वेगळीच श्रद्धेची सजावट पाहायला मिळते, जिथे सुगंध फक्त फुलांचा नाही, तर भक्तीचा असतो.