TRENDING:

BMC Elections : मुंबईचा धुरंधर कोण? भाजप-ठाकरेंचा थेट सामना, निवडणुकीची तारीख जाहीर, निकाल कधी?

Last Updated:

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह महाराष्ट्रातल्या सर्व 29 महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह महाराष्ट्रातल्या सर्व 29 महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. यासाठीची आचारसंहिता आजपासूनच लागू करण्यात आली आहे. मुंबई तसंच नवी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका या 15 जानेवारीला होणार आहेत, तर या निवडणुकांची मतमोजणी 16 जानेवारी रोजी होईल.
मुंबईचा धुरंधर कोण? भाजप-ठाकरेंचा थेट सामना, निवडणुकीची तारीख जाहीर, निकाल कधी?
मुंबईचा धुरंधर कोण? भाजप-ठाकरेंचा थेट सामना, निवडणुकीची तारीख जाहीर, निकाल कधी?
advertisement

मुंबई आणि नवी मुंबईसह महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुकांसाठीची आचारसंहिता आजपासूनच निवडणूक आयोगाने लागू केली आहे, त्यामुळे कोणत्याच राजकीय पक्षाला प्रकल्पांचं उद्घाटन किंवा लोकार्पण तसंच भूमिपूजन करता येणार नाही. तसंच मतदानावर परिणाम होईल, अशी कोणतीही घोषणा करण्यात येणार नाही.

मुंबईमध्ये 227 प्रभाग तर नवी मुंबईमध्ये 111 प्रभागांमध्ये मतदान पार पडणार आहे. या मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेच्या तारखा आणि कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

advertisement

अर्ज भरण्याची तारीख

23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025

अर्ज छाननीची तारीख

31 डिसेंबर 2025

अर्ज मागे घ्यायची तारीख

2 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी

3 जानेवारी 2026

निवडणुकीची तारीख

15 जानेवारी 2026

मतमोजणीची तारीख

16 जानेवारी 2026

ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला

मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंचा सामना भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरुद्ध आहे. याआधी 2017 साली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली होती, तेव्हा राज्यात युतीमध्ये असूनही भाजप आणि शिवसेना मुंबई महापालिकेत वेगळी निवडणूक लढले होते. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली होती. शिवसेनेने 84 तर भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या, यानंतर मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा महापौर बसला.

advertisement

नवी मुंबईत शिंदे-नाईक आमने-सामने

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
115 वर्षांची परंपरा, पुण्यातील प्रसिद्ध पाणीपुरी, जपलीये तिचं चव, Video
सर्व पहा

दरम्यान नवी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते आणि मंत्री गणेश नाईक यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली, यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये थोडा तणावही निर्माण झाला होता.

मराठी बातम्या/मुंबई/
BMC Elections : मुंबईचा धुरंधर कोण? भाजप-ठाकरेंचा थेट सामना, निवडणुकीची तारीख जाहीर, निकाल कधी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल