दिवाळीच्या काळात प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते नागपूर दरम्यान सहा जादा फेऱ्या चालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुणे ते नागपूर दरम्यान बारा विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. 26 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान या जादा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
Tiger Attack: महाराष्ट्रातील 'या' मार्गावरून जाताना सावधान! वाहन चालकांवर वाघिण करतेय हल्ला
advertisement
दरम्यान, विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू झाले असून गाडी क्रमांक 01011 ही सीएसएमटी – नागपूर विशेष गाडी मध्यरात्री 12.20 वाजता रवाना होईल. तर त्याच दिवशी नागपुरात दुपारी 4.05 वाजता पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 01012 नागपूरहून रात्री 22.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 14.05 वाजता मुंबईत पोहोचेल.
थांबे कुठे?
या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा आदी स्थानकांवर थांबे असतील.






