TRENDING:

महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायी, कोल्हापूरहून आलेले तरुण करतायत 10 वर्षांपासून संविधानाचा प्रसार

Last Updated:

कोल्हापूरहून आलेली मंडळी गेल्या दहा वर्षांपासून संविधानाचा प्रसार करत आहेत. संविधान अंगीकारने, त्याची अंमलबजावणी करणे तसेच विधायक हस्तक्षेप करण्याचं काम ही मंडळी करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निकता तिवारी, प्रतिनिधी 
advertisement

मुंबई : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी दादरच्या चैत्यभूमी येथे राज्यभरातून आणि देशभरातून अनेक अनुयायी त्यांना वंदन करण्यासाठी दाखल होतात. या अनुयांपैकी अनेक अनुयायी 5 डिसेंबर रोजी येथे येऊन स्थायिक होतात. यामध्ये अनेक तरुण मंडळी देखील असतात.

कोल्हापूरहून आलेली मंडळी गेल्या दहा वर्षांपासून संविधानाचा प्रसार करत आहेत. संविधान अंगीकारने, त्याची अंमलबजावणी करणे तसेच विधायक हस्तक्षेप करण्याचं काम ही मंडळी करतात. सोप्या भाषेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत संविधान पोहोचवणं हा यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे. संविधानाबद्दल लोकांच्या मनात काही ना काही शंका असतात, त्याचे निरासन करतात. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे संविधानिक पद्धतीने वागणे याची जाणीव ही मंडळी सर्वांना करून देतात.

advertisement

Pushpa 2 Movie Review : एक्शन आणि इमोशनल एकत्र! पुष्पा 2 पाहून कोल्हापूरकर काय म्हणाले…Video

तरुण मंडळी पैकी राजवैभव शोभा रामचंद्र सांगतो 'चैत्यभूमीवर आल्यानंतर वर्षभर पुरणारी ऊर्जा जी चळवळीसाठी जी लोकांच्या भल्यासाठी म्हणून घेऊन जायचं. हिच उर्जा इथून सर्वसामान्य लोकं घेऊन जातात. इथल्या लोकांशी बोलणं, त्यांच्याशी संविधान संवाद आम्ही करणार आहोत.'

advertisement

या शिवाय रुपेश शोभा अनुभव सांगताना नमूद करतो की "बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कारण उद्या जर तुम्ही पाहिले तर नऊवारी साडी घातलेली स्त्री डोक्यावर संविधानाची प्रत ठेवून जात असते. हे कुठेही बघायला मिळत नाही फक्त इथे बघायला मिळतं. संविधान पोहोचवण्याचे मोठं व्यासपीठ दादरमधील चैत्यभूमी हा परिसर आणि इथे जमलेल्या समुदाय आहे.'

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुळाची झाली भाव वाढ, केळी आणि आल्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

5 डिसेंबर दादरमध्ये दाखल झालेल्या जनसमुदायासाठी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य तपासणी शिबिर, राहण्याची सोय अशा वेगवेगळ्या सोयी केल्या जातात. पालिकेतर्फे शासनातर्फे या ठिकाणी अनुयायांसाठी नेहमीच सुविधा देखील असतात.

मराठी बातम्या/मुंबई/
महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायी, कोल्हापूरहून आलेले तरुण करतायत 10 वर्षांपासून संविधानाचा प्रसार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल