मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दादरच्या चैत्यभूमी परिसरात आज राज्यभरातून अनुयायी दाखल झाले आहेत. राज्यभरातून येणारे अनुयायी येताना सोबत हार किंवा फुलं ही सामग्री घेऊन येतात. अनेकदा या सामग्रीचा उपयोग होत नसतो, त्याचं निर्मल्यात रूपांतर होते. याच निर्माल्याला थांबण्यासाठी सुजीत जाधव आणि फॅम समुहाची मंडळी एक वही एक पेन हा उपक्रम राबवत आहेत.
advertisement
एक वही एक पेन हा उपक्रम ही मंडळी गेल्या दहा वर्षांपासून करत आहेत. दादरच्या चैत्यभूमीवर आज सकाळपासून जवळपास 50 डझन वह्या त्यांच्याकडे जमा झाल्या आहेत. या शिवाय दिवसभरात जवळपास 400 ते 500 डझन वाया जमा होतील असा अंदाज सुजीत जाधव यांनी वर्तवला आहे.
आम्ही कचरा उचलणार नाही, पण....; 3500 अनुयायांची बाबासाहेबांना अनोखी मानवंदना, तुम्हीही कराल कौतुक
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की प्रत्येकाने शिक्षण घ्यावे. प्रत्येक व्यक्ती शिकला पाहिजे. याच मुल्याला डोळ्यांसमोर ठेवून ही मंडळी एक वही एक पेन हा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाच्या अंतर्गत ही मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देताना फुल हारांच्या ऐवजी एक वही आणि एक पेन ठेवावा असा संदेश देत उपक्रम राबवत आहे.
यांच्याकडे जमा झालेल्या वह्यांचे वाटप नंतर 3 जानेवारी म्हणजेच सावित्री ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनापासून ते 12 जानेवारी म्हणजे मता जिजाऊ यांच्या जन्म तिथीपर्यंत वेगवेगळ्या शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाते. म्हणजे एक वही एक पेन अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या शिक्षणाला चालना मिळते.