वडेट्टीवार यांनी काय म्हटले?
राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक सुरू आहे. विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये पर्यायाने महाविकास आघाडीत भांडणे लावण्याचा प्रयत्न होत आहे. सध्या समोर येत असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. शिवसेना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत आहेत आणि आम्ही आघाडी म्हणून लढणार आहोत असेही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
advertisement
राज्यातील काँग्रेस नेत्यांनी ठाकरे गटाच्या ताठर भूमिकेबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण, या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. आमची फक्त उमेदवारांच्या यादीबाबत चर्चा झाली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे काही जागांवर वाद निर्माण झाला आहे. या वादांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न तिन्ही पक्षांकडून सुरू आहे. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वच जागांसाठी शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली.
