बीकेसी ते विमानतळ थेट जोडण्याचा प्रस्ताव
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि तज्ज्ञ संस्थांना या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. या बोगद्यामुळे मुंबईच्या बीकेसी बिझनेस डिस्ट्रिक्टमधून थेट नवी मुंबई विमानतळापर्यंत जाता येईल.
advertisement
सध्या मुंबईतून विमानतळाकडे जाण्यासाठी वाशी, पनवेलमार्गे प्रवास करावा लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि वेळ दोन्ही वाढतात. परंतु, हा बोगदा पूर्ण झाल्यास प्रवासाचा कालावधी फक्त 20 ते 25 मिनिटांवर येऊ शकतो, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
वाहतूक सुलभतेसाठी मोठा टप्पा
नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर दरवर्षी सुमारे दोन कोटी प्रवासी या टर्मिनलचा वापर करतील. त्यामुळे सध्याचे रस्ते आणि महामार्ग पुरेसे ठरणार नाहीत. या पार्श्वभूमीवर हा बोगदा प्रकल्प वाहतूक सुलभ, वेगवान आणि पर्यावरणपूरक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याशिवाय हा मार्ग मेट्रो, जलवाहतूक आणि उपनगरी रेल्वे नेटवर्कशीही जोडला जाईल, अशी योजना आहे.
विमानतळाचे उद्घाटन, वाहतूक नियोजन तयार
8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे. वाहतुकीचा ताण टाळण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.