‘MetroConnect 3’ ॲपमधून मिळणार सुविधा
मुंबईतील मेट्रो 3 (आरे–कफ परेड मार्गिका) वर प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांना 25 टक्के तिकीट सवलत देण्याचा निर्णय अखेर लागू करण्यात आला आहे. येत्या रविवारपासून ही सवलत प्रत्यक्षात मिळणार असून, प्रवाशांना ‘MetroConnect 3’ या अधिकृत ॲपद्वारे ही सुविधा मिळू शकते.
Pune News: सायंकाळची वेळ; शेतात गेलेल्या तरुणावर बिबट्याची अचानक झडप, पण शेवट वेगळाच
advertisement
इतर मेट्रो मार्गिकांवर सवलत उपलब्ध
दिव्यांगासाठी बस, एसटी आणि रेल्वेत विविध सवलती उपलब्ध आहेत. लोकल तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेत 80 टक्के दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना 75 टक्के सवलत, तर त्यांच्या मदतनीसाला 50 टक्के सवलत दिली जाते. मुंबईतील मेट्रो 1 (घाटकोपर–वर्सोवा), मेट्रो 2 A (दहिसर–अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो 7 (दहिसर–गुंदवली) या मार्गिकांवरही दिव्यांग प्रवाशांना सूट लागू आहे.
मात्र मेट्रो 3 वर ही सुविधा आजवर उपलब्ध नव्हती, त्यामुळे अनेक दिव्यांग संघटनांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीद्वारे ही सवलत तातडीने लागू करण्याची मागणीही केली होती. या मागणीला प्रतिसाद देत एमएमआरसीने अखेर निर्णय जाहीर केला असून, मेट्रो 3 मार्गिकेवर दिव्यांग प्रवाशांना तिकीट दरात 25 टक्के सवलत देण्यात येईल, असे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.
या निर्णयामुळे दररोज मेट्रो 3 वर प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, मेट्रो प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा होणार आहे.






