मध्य वैतरणा तलावातील साठ्यातही घट झाली असून, 8 ऑगस्ट रोजी या धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. सध्या मुंबईच्या सातही तलावांतील मिळून एकूण पाणीसाठा 89.17 टक्के इतका असून, गेल्या वर्षी याच कालावधीत (11 ऑगस्ट 2024) हा साठा 92.20 टक्के होता. म्हणजेच सध्या साठा 3 टक्क्यांनी कमी आहे. सर्व तलाव 1,57,000 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.
advertisement
दरम्यान, पालिकेच्या जल अभियंता विभागाने ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्व तलाव सप्टेंबर अखेरीस पूर्ण क्षमतेने भरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
बारवी धरणात 96 टक्के पाणी
ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणातही 96 टक्के पाणीसाठा झाला असून, आतापर्यंत 1993 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात 339.840 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून, मागील वर्षी 9 ऑगस्ट रोजी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते.