TRENDING:

मुंबईकर पाण्याची चिंता सोडा, धो धो पावसानं धरणं भरली, या धरणात 100 टक्के जलसाठा!

Last Updated:

Mumbai Water: मुंबईत झालेल्या पावसामुळे जुलै महिन्यातच 7 धरणांतील पाणीसाठा वाढला असून मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे. सध्या सर्व धरणांत मिळून 74 टक्के जलसाठा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईकरांसाठी जुलै महिन्यातच दिलासादायक बातमी आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये सध्या 74 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे. या सातही धरणांची एकत्रित पाणीसाठा क्षमता 14,47,363 दशलक्ष लिटर आहे. सध्या त्यामध्ये सुमारे 10,69,357 दशलक्ष लिटर पाणी साठलेले आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे.
मुंबईतील धरणे जलयुक्त, मोडकसागरने १०० टक्के साठवणूक क्षमता गाठली.
मुंबईतील धरणे जलयुक्त, मोडकसागरने १०० टक्के साठवणूक क्षमता गाठली.
advertisement

भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा, तानसा, वेअर, तुळशी आणि मध्य वैतरणा ही सात प्रमुख धरणं मुंबईला पाणीपुरवठा करतात. यापैकी मोडक सागर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून 100 टक्के जलसाठा गाठला आहे. मध्य वैतरणा धरणामध्ये सध्या 93.47 टक्के पाणीसाठा असून, तेथील पाण्याची पातळी गेल्या 24 तासांत दोन मीटरने वाढली आहे. सध्या या धरणात 1,80,890 दशलक्ष लिटर पाणी जमा आहे.

advertisement

Pune Water: पुणेकरांचं पाण्याचं टेन्शन संपलं, पाणीपुरवठा करणारं कोणतं धरण किती भरलं?

मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने तलावांमध्ये पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. सोमवारी मध्य वैतरणा तलावाच्या पातळीत वाढ झाल्यानंतर मोडक सागरच्या तीन दरवाजांद्वारे खालच्या जलाशयात पाणी सोडण्यात आले. सध्या मोडक सागर धरणाची पातळी 94.82 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या भागात गेल्या 24 तासांत 25 मिमी पावसाची नोंद झाली.

advertisement

सध्या वेहार (47.68 टक्के) आणि तुळशी (46.97 टक्के) वगळता सर्व धरणे 60 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने भरली आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच काळात एकूण पाणीसाठा केवळ 18.73 टक्के होता. यंदा पावसाळा वेळेआधी सुरू झाल्यामुळे धरणांमध्ये भरपूर पाणी साठवण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील सात दिवसांत महाराष्ट्र, गोवा आणि कोकण भागात मध्यम ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात उर्वरित धरणांमध्येही पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. ही स्थिती मुंबईकरांसाठी निश्चितच दिलासादायक आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकर पाण्याची चिंता सोडा, धो धो पावसानं धरणं भरली, या धरणात 100 टक्के जलसाठा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल