परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 2009 पासून लोकप्रतिनिधी म्हणून मिरा-भाईंदरच्या नागरिकांचे प्रतिनिधित्व केले आहे. या भागातील नागरिकांना वेगवान आणि सोयीस्कर परिवहन सेवा मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारामुळेच हे नवीन उप-आरटीओ मंजूर झाले आहे.
वाहनधारकांना होणार मोठा फायदा
हे नवीन कार्यालय सुरू झाल्यामुळे वाहन परवाने, नोंदणी, प्रदूषण प्रमाणपत्र, रस्ता कर आणि इतर वाहतूकविषयक कामे सोपी आणि जलद होतील. सध्या कार्यरत आरटीओ कार्यालयांवरील गर्दी कमी होणार आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
advertisement
सरकारने उत्तन येथे जागा निश्चित केली असून, भविष्यात येथे प्रशस्त कार्यालय उभारले जाईल. यामुळे मिरा-भाईंदर आणि परिसरातील वाहनधारकांना मोठा फायदा होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 28 फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला. 1 मार्च हा आरटीओ स्थापना दिवस आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मिरा-भाईंदरच्या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे, असे ते म्हणाले होते.
उन्हाळ्यात जळजळ अन् डोळ्यातून पाणी, फॉलो करा 5 टिप्स, तुमचे डोळे राहतील निरोगी
राज्यात उप-आरटीओंची संख्या 24 वर
या नवीन उप-आरटीओसह, राज्यातील एकूण उप-आरटीओंची संख्या 34 वर पोहोचली असून, मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) आता 11 परिवहन कार्यालये झाली आहेत.
दिवाणी न्यायालय आणि पोलीस आयुक्तालयाचीही शक्यता
यासोबतच 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून मिरा-भाईंदरमधील नव्या दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. भविष्यात मिरा-भाईंदरमध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालयही निर्माण केले जाईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.